Cheapest Electric Cars : ‘या’ आहेत सर्वात स्वस्त 5 Electric Cars

Cheapest Electric Cars । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा आणि तरुणांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इलेक्ट्रिक गाड्या या दिसायला तर आकर्षक असतातच याशिवाय पेट्रोल- डिझेलची कटकट नाही. ग्राहकांची मोठी मागणी पाहता अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करत आहेत. तुम्ही सुद्धा नवीन इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला स्वस्तात मस्त ५ इलेक्ट्रिक गाड्या सांगणार आहोत ज्या दमदार फीचर्सने सुसज्ज आहेत.

   
MG Comet EV

१) MG Comet EV

भारतीय मार्केट मध्ये MG Motor India या कंपनीने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (Cheapest Electric Cars) लॉन्च केली आहे. या कारच नाव MG Comet EV असून ही कार स्पेशल गेमिंग एडिशन आहे. ही कंपनी बाजारामध्ये इलेक्ट्रिक कारचा एक हेवी मॉडेल देखील लॉन्च करणार आहे. या एमजी कॉमेट इव्ही गेमर मॉडेलला मोर्टर या नावाने प्रसिद्ध असलेल्या टॉप गेमर्स नमन माथुर यांनी डिझाईन केलेलं आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 8.65 लाख रुपये एवढी आहे. MG Motor India कंपनीच्या MG Comet EV या कारमध्ये 17.3 kwh बॅटरी देण्यात आली आहे. ही कार एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर 230 किलोमीटर पर्यंत रेंज देते. या कारमध्ये इको नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्राईव्ह मोड उपलब्ध आहे. कारच्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 10.25 इंच चा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट स्ट्रक्चर, पावर विंडो आणि 12 इंच स्टील व्हील असे फीचर्स मिळतात.

Tata Nexon EV

2) Tata Nexon EV – Cheapest Electric Cars

भारतीय बाजारामध्ये टाटा मोटर्स या आघाडीला असलेल्या ऑटोमोबाईल कंपनीने नेक्सन ईव्ही फेसलिफ्ट लॉन्च केली आहे. टाटा नेक्सन ही देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या SUV पैकी एक आहे. Tata Nexon ev Facelift ही कार नवीन इंटेरियर आणि एक्स्टिरियल मध्ये बऱ्याच बदलांसह लॉन्च करण्यात आली आहे. या कारला कंपनीने पूर्णपणे फ्रेश लुक दिला आहे.Tata Nexon ev Facelift या कारमध्ये सेकंड जनरेशन मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 16000rpm पर्यंत चालण्यास सक्षम असून 142.6 bhp पावर आणि 2500 nm मॅक्झिमम पीक टॉर्क जनरेट करते. टाटाची ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर 465 किलोमीटर रेंज देते. कारचे टॉप स्पीड 150 किलोमीटर प्रति तास इतकं असून अवघ्या 8.9 सेकंदामध्ये ही कार 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग वाढवण्यास सक्षम आहे. कारमध्ये IRA 2.0 मोबाईल कनेक्टेड टेक्नॉलॉजी, व्हॉइस असिस्टेड इलेक्ट्रिक सनरुफ, JBL 9 स्पीकर साऊंड सिस्टिम , वायरलेस चार्जर, वायरलेस एप्पल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नेव्हिगेशन डिस्प्ले हे फीचर्स उपलब्ध आहेत. टाटा मोटर्सच्या ह्या नेक्सन फेसलिफ्ट ईव्ही ची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 14 लाख 74 हजार ते 19 लाख 94 हजार रुपये एवढी आहे.

Mahindra XUV 400

३) Mahindra XUV 400

महिंद्रा कंपनी ही भारतातील ट्रस्टेड आणि प्रसिद्ध ऑटो निर्माता कंपनी आहे. ही कंपनी मजबूत आणि टिकाऊ कार बनवण्यासाठी देखील ओळखली जाते. महिंद्राने इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये पदार्पण केले आहे. आणि XUV 400 इलेक्ट्रिक कार लॉन्च (Cheapest Electric Cars) केली होती. XUV 400 या इलेक्ट्रिक कार मध्ये 34.5 kWh लिथियम आयन बॅटरी उपलब्ध आहे. ही बॅटरी 7.2 KW आणि 3.3 kw चार्जिंग ला सपोर्ट करते. XUV400 या इलेक्ट्रिक कार मध्ये देण्यात आलेली मोटर 150 बीएसपी पावर आणि 310 nm पिक टॉर्क जनरेट करते. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर महिंद्राची ही इलेक्ट्रिक कार तब्बल 375 किलोमीटर पर्यंत अंतर कापू शकते. तसेच तिचा टॉप स्पीड 150 किमी प्रति तास इतकं आहे. या इलेक्ट्रिक कार मध्ये मल्टी ड्राईव्ह मोड देण्यात आले आहे. हे मोड रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीमसह थॉटल ऍडजेस्ट करण्यास मदत करतात. या कारची किंमत 15.99 लाख रुपये ते 19.49 लाख रुपये एवढी आहे.

Tata Tiago EV

४) Tata Tiago EV-

टाटा मोटर्सच्या Tata Tiago EV कारची किंमत 8.69 लाख रुपये एवढी आहे. या इलेक्ट्रिक कार मध्ये 19.2 kwh आणि 24kwh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही बॅटरी ही बॅटरी चार्ज करण्यासाठी 3.6 तास लागतात परंतु एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर टाटाची ही इलेक्ट्रिक कार 315 किलोमीटर पर्यंत रेंज देते. यामध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, प्रोजेक्टर हेड लॅम्प, क्रूज कंट्रोल, ऑटो फोल्ड यासह इलेक्ट्रिक ओआरव्हीएम , ऑटो हेडलॅम्प , रेन सेंसिंग वायपर हे फीचर्स देण्यात आले आहे.

Citroen eC3 photoutils.com

५) Citroen eC3

सिल्ट्रॉन C3 ही इलेक्ट्रिक वर्जन कार असून यामध्ये नवीन डिझाईन सह सेंटर कन्सोल, मॅन्युअल गिअर लिव्हर, नवीन ड्राईव्ह कंट्रोलर देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक कार मध्ये 29.2 KWH क्षमता असलेला बॅटरी पॅक उपलब्ध असून यामध्ये 3.3 kw क्षमता असलेली ऑन बोर्ड चार्जर देखील उपलब्ध आहे. ही इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक कार 57 एचपी पावर आणि 143 nm पिक टॉर्क जनरेट करते. सिंगल चार्ज मध्ये ही कार 320 किलोमीटर पर्यंत ड्रायव्हिंग रेंज असून तिचे टॉप स्पीड 107 किलोमीटर प्रति तास इतकं आहे. या इलेक्ट्रिक कार मध्ये हाय स्पेक व्हेरीएंट फील मध्ये 10.2 इंच टच स्क्रीन, वायरलेस एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो, चार स्पीकर ऑडिओ सिस्टीम, हाईट ऍडजेस्टेबल ड्रायव्हिंग सीट हे फीचर्स देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत 8.49 लाख रुपये ते 11.79 लाख रुपयांपर्यंत आहे.