अरेच्चा!! चीनने बनवला खोटा सूर्य; काय आहे यामागील उद्देश?

टाइम्स मराठी । चिनी लोक (China) कधी काय करतील हे आपण सांगू शकत नाही. खाण्यापिण्यापासून ते खोट्या वस्तू आणि पदार्थ बनवण्यापर्यंत चीनचा हात कोणीच धरू शकत नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का? चिनी लोकांनी खोटा सूर्य सुद्धा (Artificial Sun) बनवला आहे. ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. 2006 पासून ची नकली सूर्य बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. नकली सूर्य बनवण्याचा मेन उद्देश हा देशाच्या विजे संबंधित आणि ऊर्जेची गरज पूर्ण करणे आहे. चिनी लोकांनी बनवलेला हा आर्टिफिशियल सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा जास्त ऊर्जा प्रदान करेल. असं सांगण्यात येत आहे.

   

याबाबत चीनच्या सरकारी न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन यांनी सांगितलं की, त्यांनी न्यूक्लिअर फ्युजनच्या माध्यमातून हा नकली सूर्य बनवला आहे. त्याचबरोबर हा सूर्य टोकामॅक मशीनच्या मदतीने बनवण्यात आला असून ते दहा लाख एंपियर पेक्षा जास्त प्लाजमा करंट तयार करतो. हा नकली सूर्य बनवण्याच्या प्रक्रियेमधून बरीच ऊर्जा निर्माण झाली. सीएनएनसी म्हणजेच चायना नॅशनल न्यूक्लियर कॉर्पोरेशन यांनी सांगितल्याप्रमाणे न्यूक्लियर फ्युजन हे चीनच्या अनु ऊर्जा विकास धोरणांच्या तीन निर्माण खंडांपैकी एक आहे.

चीनने या आर्टिफिशियल सूर्याला HL- 2M असे नाव दिले आहे. 2006 पासून चीनचा हा प्रोजेक्ट सुरू आहे. या प्रोजेक्टसाठी 22.5 बिलियन डॉलर एवढा खर्च आला आहे. हा प्रोजेक्ट चीनच्या नॅशनल न्यूक्लिअर कॉर्पोरेशन सह साउथ वेस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स च्या वैज्ञानिकांनी बनवला असून या प्रोजेक्टचा उद्देश कोणत्याही वातावरणात सोलर एनर्जी बनवणे हा आहे. चीनने बनवलेल्या आर्टिफिशियल सूर्याचा प्रकाश हा खऱ्याखुऱ्या सूर्यापेक्षा तेज आहे.

जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वैज्ञानिक नकली सूर्य बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु आता चीनने ही नकली सूर्य बनवण्याची प्रक्रिया पूर्ण करून अमेरिका जपान, रशिया यासारख्या सर्व देशांना टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मागे पाडले आहे. आर्टिफिशियल सूर्य हा खऱ्या सूर्याच्या दहा पट गरम आहे. खऱ्याखुऱ्या सूर्याचे तापमान हे 15 मिलियन डिग्री सेल्सियस एवढे आहे. त्याहीपेक्षा दहापट म्हंटल्यास आर्टिफिशियल सूर्याचे तापमान भरपूर असेल.