टाइम्स मराठी | भारताचा शेजारील देश असलेल्या चीनच्या अजब गजब गोष्टी नेहमीच ऐकत असतो. याशिवाय शेजारील देशावर आक्रमण करण्याची आणि त्यांच्या जमिनीचा भाग बलकवण्यात सुद्धा चीन अग्रेसर असते. आता तर चीनने एक नवीन कामगिरी हाती घेतली आहे. आता पृथ्वीच्या भूगर्भात जाण्यासाठी चीनने खोदकाम सुरू केले आहे. दुर्मिळ असणाऱ्या नैसर्गिक वायूच्या शोधात चीनने जमिनीत १० किलोमीटर पर्यंतचे बोअरहोल पाडण्यास सुरुवात केली आहे.
याबाबतची माहिती शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली आहे. या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, छिद्राची खोली 10,520 मीटर इतकी आहे. हा प्रकल्प सीएनपीसीने शिनजियांग प्रांतात खोदलेल्या विहिरीच्या ड्रिलिंग प्रकल्पासारखा आहे. ही विहिर चीनमधील सर्वात खोल विहीर ठरली आहे. तसेच, सध्या सुरु असलेला ड्रिलिंग प्रकल्प उच्च तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी आणि पृथ्वीच्या अंतर्गत संरचनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आखण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पृथ्वीच्या भूगर्भात असलेले नैसर्गिक वायूचे साठे शोधण्यास मदत होईल. चीनने देशातील कंपन्यांवर दबाव आणत इंधन सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे.
त्यामुळे पृथ्वीच्या आत असलेला नैसर्गिक वायू कितीही खोल असला तरी तो बाहेर काढण्याचा चीनच्या सरकारी कंपन्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या प्रकल्पांतर्गत चीनने 10 किलोमीटरची विहीर खोदण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पाच्या बोअरहोलची खोली 10,520 मीटर आहे. मुख्य म्हणजे तिने पृथ्वीच्या भूगर्भात जाण्यासाठी जी खोली ठरवली आहे तिथे पोहोचणे सर्वात कठीण आहे. पृथ्वीच्या आत तापमान 224 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. यासोबतच 138 मेगा पास्कलच्या खूप उच्च दाब पृथ्वीच्या भूगर्भात आहे. त्यामुळे चीनला या सर्व बाबी तपासून सर्व जोखीम पत्करून ही मोहीम राबवावी लागणार आहे.