चीनने लॉन्च केले जगातील सर्वात फास्ट इंटरनेट; एका सेकंदात 150 HD चित्रपट होतील ट्रान्सफर

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक व्यक्ती जवळ मोबाईल उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने कामे केली जातात. परंतु स्मार्टफोन वापरासाठी इंटरनेट सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे. इंटरनेट सर्विस शिवाय ऑनलाइन पद्धतीने कोणतेच कामे करता येऊ शकत नाही. भारतामध्ये Jio, Airtel या टेलिकॉम कंपन्या  ग्राहकांना अप्रतिम इंटरनेट सुविधा पुरवत असतात. परंतु आता चीनने जगातील सर्वात फास्ट इंटरनेट लॉन्च केले आहे. या इंटरनेट सुविधेची स्पीड हे  सध्या उपलब्ध असलेल्या इंटरनेट पेक्षा 10 पट जास्त आहे.

   

2025 पूर्वीच सुरू केली स्पीड इंटरनेट सुविधा

ही हाय स्पीड इंटरनेट सुविधा 2025 पर्यंत लॉन्च करण्यात येणार नाही अशी अशा होती. परंतु चीन ने 2 वर्षांपूर्वीच हाय स्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध केली. या नवीन नेटवर्क च्या माध्यमातून युजर्स ला 1.2 TBPS (टेराबाईट) इतकं इंटरनेट स्पीड मिळेल. म्हणजेच युजर्स काही सेकंदामध्ये 150 HD क्वालिटी असलेली चित्रपट ट्रान्सफर करू शकतात. आणि 1200 GB प्रति सेकंदाच्या स्पीड मध्ये इंटरनेट वापरू शकतात. ही इंटरनेट सुविधा पहिली देशव्यापी एज्युकेशन आणि रिसर्च कम्प्युटर नेटवर्क आहे.

CERNET चे नवीन व्हर्जन

सध्या बरेच युजर्स 5G नेटवर्क सुविधेचा लाभ घेत आहेत. परंतु चीन या सर्वांच्या पुढे आहे. या प्रोजेक्टवर चीनकडून दहा वर्षांपासून काम सुरू आहे.  ही इंटरनेट स्पीड TSINGHUA युनिव्हर्सिटी, चायना मोबाईल, हुवावे टेक्नॉलॉजी आणि  CERNET कॉर्पोरेशन सोबत मिळून तयार करण्यात आली आहे. चीनने लॉन्च केलेली  इंटरनेट स्पीड ही चीनच्या फ्युचर इंटरनेट टेक्नॉलॉजी इंट्रास्ट्रक्चर चा भाग आहे. यासोबतच चायना एज्युकेशन आणि रिसर्च नेटवर्क CERNET चे नवीन व्हर्जन असून ही इंटरनेट सर्विस 3000 किलोमीटर पर्यंत पसरलेल्या ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या माध्यमातून मिळते.