Citroen Basalt SUV : फक्त 7.99 लाख रुपयांत लाँच झाली Citroen ची नवी SUV; पहा काय फीचर्स मिळतात??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात नवी SUV कार लाँच केली आहे. Citroen Basalt SUV असं या कारचे नाव असून हि कार अवघ्या 7.99 लाख रुपयांत बाजारात आली आहे. या कारचे बुकिंग सुरु झालं असून कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर अवघ्या 11,001 रुपयांच्या टोकन रकमेसह ग्राहक या SUV चे बुकिंग करू शकतात. आज आपण या कारचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात…..

   

लूक आणि डिझाईन – Citroen Basalt SUV

Citroen Basalt SUV च्या लूक आणि डिझाईनकडे बघितलं तर हि कार C3 Aircross मॉडेलपासून बनलेली आहे. समोरच्या बाजूने पाहिल्यास एअरक्रॉससारखाच गाडीचा लूक आहे. यात नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील, एलईडी टेल लॅम्प आणि चंकी ड्युअल-टोन रिअर बंपर दिसतोय. कारला रूफलाइनची सुविधाही देण्यात आलीये. कंपनीने हि कार पोलर व्हाइट, स्टील ग्रे, प्लॅटिनम ग्रे, कॉस्मो ब्लू आणि गार्नेट रेड अशा 5 मोनोटोन कलरमध्ये लाँच केली आहे. बेसॉल्टची केबिन मोठ्या प्रमाणात प्रिमियम बनवण्यासाठी कंपनीने भरपूर प्रयत्न केलेत. यात 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील, रिअर एसी व्हेंट्स, वायरलेस ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात.

पॉवरट्रेन –

Citroen Basalt SUV कार २ पेट्रोल इंजिन पर्यायांसह लाँच झाली आहे. यातील 1.2 लिटर क्षमतेचे तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन 82hp पॉवर आणि 115Nm टॉर्क जनरेट करते तर टर्बो पेट्रोल इंजिन 110hp पॉवर जनरेट करते. हे टर्बो इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की या कारमध्ये 470 लीटरची बूट स्पेस आहे. Citroen ची हि SUV कार भारतीय बाजारपेठेत Tata Curve, Tata Nexon शी स्पर्धा करेल.