Citroen C3 Aircross भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये परवडणाऱ्या दरात मिळणाऱ्या गाड्यांची चांगलीच चलती आहे. कमीत कमी पैशात चांगल्या फीचर्सने सुसज्ज गाडी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने नवीन कार लॉन्च केली आहे. Citroen C3 Aircross असे या कार च नाव असून ही कार खरेदी करणं सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारे आहे. येत्या 15 ऑक्टोंबर पासून या कारची विक्री सुरू होणार आहे.

   

Citroen C3 Aircross या कारमध्ये १० इंचची टच स्क्रीन देण्यात आली आहे. ही टच स्क्रीन वायरलेस एप्पल कार प्ले, अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते. एवढेच नाही तर यामध्ये रियर व्ह्यू कॅमेरा देखील देण्यात आला आहे. परंतु कारमध्ये सनरूप, क्लायमेट कंट्रोल यासारखे फीचर्स उपलब्ध नसून टॉप अँड ट्रिम मध्ये 6 एअर बॅग फिचर्स देण्यात आलेले नाहीत. मात्र या कारमध्ये कंपनीने उपलब्ध करून दिलेला स्पेस आणि या एसयूव्हीची साईज ग्राहकांना आकर्षित करते.

इंजिन – Citroen C3 Aircross

Citroen C3 Aircross या कार मध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजन देण्यात आले आहे. हे इंजिन 110 एचपी पावर आणि 190 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. सध्या तरी या कार मध्ये सहा स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आले आहे. काही काळानंतर यामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध करण्यात येणार आहे. Citroen C3 Aircross प्रतिलिटर 18.5 किलोमीटर रेंज देण्यास सक्षम आहे .

किंमत किती?

Citroen C3 Aircross या एसीबी कारच्या किमतींची कंपनीने घोषणा केली असून ही कार 10 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे. ही किंमत Citroen C3 Aircross या कारच्या बेस व्हेरियेण्टची असून बाकीच्या व्हेरिएन्टच्या किमतीचा खुलासा अजून करण्यात आलेला नाही. परंतु या कारचा टॉपअँड व्हेरिएंटची किंमत 12 लाख रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.