कमी बजेटमध्ये फुल्ल मजा; CMF चे Smart Watch तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर

टाइम्स मराठी । नथिंग स्मार्टफोन बद्दल तुम्ही ऐकलेच असेल. कंपनीने नथिंग फोन आणि एअर बर्ड्स लॉन्च केले होते. या इयर बर्ड्स आणि नथिंग स्मार्टफोन ने भारतीय बाजारपेठेमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली. त्यानंतर आता नथिंगच्या सब ब्रँड CMF ने भारतीय बाजारपेठेमध्ये तीन प्रॉडक्ट लॉन्च केले आहे. या तीन प्रोडक्ट मध्ये वॉच प्रो, बर्ड्स प्रो आणि पावर 65 GaN यांचा समावेश आहे. ही स्मार्टवॉच आयओएस 13 आणि अँड्रॉइड 8 सोबतच सर्व OS वर्जन वर काम करते.

   

किंमत किती?

CMF कंपनीची ही स्मार्ट वॉच दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. त्यानुसार मेटॅनिक ग्रे केस आणि ऑरेंज स्ट्रेप मध्ये उपलब्ध असलेल्या व्हेरिएंटची किंमत फ्लिपकार्ट वर 4,499 एवढी आहे. आणि ग्रे कलर मध्ये उपलब्ध असलेल्या व्हेरिएंटची किंमत फ्लिपकार्टवर 3,999 रुपये एवढी आहे.

लुक आणि डिझाईन

CMF ने अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये अप्रतिम Smart Watch लॉन्च केले आहेत. हे वॉच साध्या आणि सोबर लूकमध्ये उपलब्ध असून यामध्ये बरेच दमदार फीचर्स देण्यात आले आहे. एवढेच नाही तर या या स्मार्टवॉचच्या बॉक्सला देखील स्टायलिश लुक देण्यात आला आहे. यामध्ये Smart Watch सोबत मॅग्नेटिक चार्जिंग केबल युजर मॅन्युअल गाईड हे उपकरण बॉक्समध्ये उपलब्ध आहे. या बॉक्सच्या फ्रंटमध्ये वॉच, आत मध्ये QR कोड, देखील उपलब्ध आहे. या QR कोडच्या माध्यमातून CMF App इन्स्टॉल करता येईल.

स्पेसिफिकेशन

CMF कंपनीच्या या Smart Watch मध्ये डार्क ग्रे कलर उपलब्ध आहे. या स्मार्टवॉच मध्ये AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1.96 इंच चा असून हा डिस्प्ले स्मूथ असला तरीही अप्रतिम काम करतो. या डिस्प्लेला 410 × 502 पिक्सल रिझोल्युशन आणि 600 नीट्स ब्राईटनेस मिळतो. या Smart Watch मध्ये कंपनीने 340mAh बॅटरी दिली असून तुम्ही एकदा चार्ज केल्यानंतर 13 दिवसापर्यंत चालवू शकता आणि पावर सेविंग मोडवर तुम्ही 45 दिवस विदाऊट चार्जिंग हे स्मार्टवॉच वापरू शकता. हे घड्याळ अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्ही मोबाईल वर काम करते.

CMF कंपनीने स्मार्ट वॉचचा डिस्प्ले अप्रतिम डेव्हलप केला आहे. या स्मार्टवॉचचा डिस्प्ले सूर्यप्रकाशामध्ये देखील खास विजीबिलिटी देतो. या डिस्प्लेमध्ये वेगवेगळे वॉचफेसेस उपलब्ध आहे. हे वॉचफेसेस कंपनीने दिलेल्या ॲपमध्ये जाऊन वेगवेगळ्या कॅटेगिरीमध्ये सिलेक्ट करू शकतात. या कॅटेगिरी मध्ये मल्टी फंक्शनालॉग डिजिटल क्रिएटिव्ह हे फीचर्स उपलब्ध आहे. यामध्ये ऑलवेज ऑन डिस्प्ले सपोर्ट देखील उपलब्ध करण्यात आला आहे.  

विदाऊट मोबाईल करा कॉलिंग

CMF कंपनीच्या या स्मार्टवॉच मध्ये कॉलिंग साठी इनबिल्ट माइक, स्पीकर आणि AI नॉईज रिडक्शन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. त्यानुसार तुम्हाला एखादा कॉल आल्यास तुम्ही स्मार्टवॉचच्या मदतीने कॉल पिक करू शकता आणि यासाठी तुम्हाला स्मार्टफोन बाहेर काढावा लागणार नाही. फक्त यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये वॉच कनेक्ट असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही गाडी ड्राईव्ह करत असताना देखील सोप्या पद्धतीने कॉल उचलू शकतात. जेव्हा तुम्ही स्मार्ट वॉचला ऑन करून राइट स्वाईप कराल तेव्हा फोन कॉलची स्क्रीन तुम्हाला दिसेल. यामध्ये रिसेंट कॉन्टॅक्ट कीपॅड यासारखे तीन ऑप्शन उपलब्ध असतील. त्यानंतर तुम्ही कीपॅड वर जाऊन नंबर डायल करू शकतात. आणि विना मोबाईल कॉलिंग करण्याचा आनंद घेऊ शकता.

हेल्थ फिटनेस फीचर्स

या Smart Watch मध्ये बरेच हेल्थ आणि फिटनेस फीचर्स देण्यात आले आहेत. त्यानुसार या वॉचमध्ये योगा,रनिंग इथपासून ते 110 स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहेत. यासोबतच कंपनीने वॉचमध्ये 24 /7 हार्ट रेट मॉनिटरिंग 24 /7  ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग, ऑटो स्ट्रेस  मॉनिटरिंग, स्लीप मॉनिटर, ब्रीदिंग एक्सरसाइज, यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच सेडेंटर रिमाइंडर, ड्रिंक वॉटर रिमाइंडर देखील यामध्ये उपलब्ध आहेत.