CNG Cars : ‘या’ कारणांमुळे CNG गाड्यांना आग लागते; वेळीच सावध होऊन उपाय करा

टाईम्स मराठी । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांचा कल हा CNG वाहनांकडे वळत आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत सीएनजी कार (CNG Cars) ची डिमांड वाढलेली आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता अनेक कार निर्माता कंपन्या आपल्या गाड्या CNG व्हेरिएन्ट मध्ये लाँच करत आहेत. एकीकडे सीएनजी कारला जास्त पसंत केले जात असले तरीही उन्हाळ्यात म्हणजे गर्मीच्या सीझनमध्ये सीएनजी कारच्या मालकाला या कारची खूप काळजी घ्यावी लागते. कारण सीएनजी कारला आग लागण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

   

1) गॅसचे प्रमाण-

सीएनजी कार वापरताना कार मध्ये भरण्यात येणाऱ्या गॅस कडे लक्ष द्यावे लागते. गाडीमध्ये कधीही फुल्ल सीएनजी भरू नये. खास करून उन्हाळ्याच्या दिवसात किंवा गरमीच्या सीजनमध्ये गॅस भरताना 1 ते 2 किलो ग्राम गॅस कमी भरावा . कारण या कार मध्ये आतमधील थर्मल पसरून आग लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रमाणापेक्षा कमी गॅस भरलेला कधीही चांगला.

2) उन्हात पार्किंग नकोच – (CNG Cars)

कधी कधी आपण कंटाळा करत उन्हातच गाडी पार्क करतो. पेट्रोल किंवा डिझेल गाडीवर याचा जास्त परिणाम होत नसला तरी CNG कारला मात्र धोका निर्माण होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये सीएनजी कार भर उन्हात उभी केली तर कारची केबिन जास्त गरम होते. त्यामुळे बऱ्याच प्रॉब्लेमला आपल्याला सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी शक्यतो उन्हात गाडी पार्क करायचे टाळा.

3) टॅंक लिकेज –

सीएनजी कार (CNG Cars) मध्ये टॅंक गळती ला बऱ्याच वेळेस सामोरे जावे लागते. जर वारंवार टॅंक गळती होत असेल अशा वेळी तुम्ही अजिबात गाफील राहू नका. वेळ वाया न घालवता तात्काळ मेकॅनिक कडे जाऊन तुम्ही तुमच्या कार मधील लिकेजचा प्रॉब्लेम सुधारू शकतात.

4) हायड्रोलिक टेस्ट –

सीएनजी कार ची हायड्रोलिक टेस्ट करणं हे अति महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हायड्रोलिक चाचणी सतत करत नसाल तर तुम्हाला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.