एकाच बाटलीने किंवा ग्लासने सतत पाणी पिता? आरोग्याला आहे धोकादायक

टाइम्स मराठी । आपल्याला दिवसातून कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून मिळत असतो. कारण दररोज भरपूर पाणी पिल्यामुळे शरीराचे आरोग्य चांगले राहते. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की एकाच भांड्याने अनेक वेळा पाणी पिल्यामुळे बरेच आजार उद्भवू शकतात. हे एका रिसर्चच्या माध्यमातून उघड झाले आहे. हे सत्य आहे की चांगल्या आरोग्यासाठी जास्त पाणी प्यायला हवं परंतु स्वच्छता देखील तेवढीच महत्त्वाची आहे.

   

आपल्याला माहीत असेल शरीराचा 70 टक्के भाग हा पाण्यापासून बनलेला आहे. आणि आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणं हे महत्त्वाचं आहे. बरेच व्यक्ती रोज एकाच ग्लासाने किंवा एकाच बाटलीने पाणी पितात. परंतु हे अत्यंत चुकीचे असून यामुळे आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. आपल्याला बऱ्याचदा जास्त पाणी पिण्याबद्दल सांगण्यात येतं. परंतु एकाच भांड्याने  किंवा एकाच बॉटल ने अनेकदा पाणी पिणे अयोग्य आहे, हे कोणी सांगत नाही. किंवा बऱ्याचदा आळस येत असल्यामुळे समोर दिसणाऱ्या ग्लासातून बऱ्याचदा पाणी पिले जातं.

 ग्लासाच्या वरच्या भागावर जमा होतात बॅक्टेरिया

एकाच ग्लासाने अनेक वेळेस पाणी पिल्यामुळे ग्लासाच्या वरच्या भागावर बॅक्टेरिया जमा होतात. आणि त्याच ग्लासाने पुन्हा पाणी पिल्यामुळे बॅक्टेरिया पोटात जातात. म्हणून बऱ्याचदा उलटी आणि जुलाब होण्याची  शक्यता वाढते. बऱ्याच वेळेस आपल्याला  वापरलेला ग्लास किंवा बॉटल स्वच्छ असल्याचे दिसते. परंतु ते स्वच्छ नसल्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेऊन काही गोष्टी करणे गरजेचे आहे.

 करा हे उपाय

पाणी पिण्यापूर्वी ग्लास साबण आणि पाण्याने चांगला स्वच्छ धुवावा. यासोबतच ग्लासच्या वरच्या भागाला चांगल्या पद्धतीने घासून स्वच्छ करावे. जेणेकरून बॅक्टेरिया राहणार नाही. यासोबतच पाण्याची बॉटल जार किंवा कंटेनर देखील नियमितपणे स्वच्छ करणे गरजेचे आहे. आपण ग्लासाला ओठ लावून पाणी पीत असल्यामुळे शरीरातील काही बॅक्टेरिया ग्लासाच्या वरच्या भागावर चिकटतात. त्यामुळे आरोग्याला नुकसान पोहोचू शकते.