या Smart Ring च्या माध्यमातून करा ऑनलाईन पेमेंट; कसे ते पहा

टाइम्स मराठी । Samsung, Boat आणि Noice या कंपन्यांनी काही महिन्यांपूर्वी स्मार्ट रिंग लॉन्च केली होती. ही डिजिटल रिंग स्मार्टवॉच प्रमाणेच काम करते. आता स्वदेशी ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवन ने  नवीन स्मार्ट रिंग लॉन्च केली आहे. ही भारतातील पहिली कॉन्टॅक्टलेस पेमेंट स्मार्ट रिंग आहे. त्यानुसार ही रिंग विदाऊट कॉन्टॅक्ट पेमेंट करण्यास परमिशन देते. या लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्ट रिंग चे नाव 7 रिंग असं ठेवण्यात आलं आहे. कंपनीने या स्मार्ट रिंगच्या खरेदीवर अर्ली बर्ड ऑफर उपलब्ध केली असून स्मार्ट रिंगवर एक वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. जाणून घेऊया या स्मार्ट रिंगचे फीचर्स.

   

या टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात आला

7 RING या लेटेस्ट लॉन्च करण्यात आलेल्या रिंग मध्ये वेगवेगळे आकार उपलब्ध आहेत. जेणेकरून ही रिंग आरामदायक अनुभव देईल. आणि बोटात व्यवस्थित बसेल. यूजर्सला ही रिंग अँपच्या माध्यमातून वापरता येऊ शकते. जेणेकरून ट्रांजेक्शन जास्त सुविधाजनक आणि सुरक्षित होईल. या 7 RING मध्ये NFC टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात आला आहे. या रिंगच्या माध्यमातून तुम्ही  एका टॅप वर सहजरीत्या पेमेंट करू शकतात. या स्मार्टरिंगला धूळ आणि पाणीरोधक सर्टिफिकेट देण्यात आले आहे. म्हणजेच तुम्ही ही स्मार्ट रिंग कोणत्याही परिस्थितीमध्ये वापरू शकता.

किंमत किती?

7 RING या स्मार्ट रिंग ची किंमत 7000 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु अर्ली बर्ड ऑफरनुसार तुम्ही ही स्मार्ट रिंग 4777 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. कंपनीने या रिंगवर 55 महिन्यांची  व्हॅलिडीटी आणि एक वर्षांसाठी वॉरंटी दिली आहे. सध्या तरी ही रिंग अशा युजर्स कडे पोहोचू शकते, ज्यांच्याकडे इनविटेशन कोड आहे.

अशा पद्धतीने करा रिंगच्या माध्यमातून पेमेंट

7 RING च्या माध्यमातून इंटरनॅशनल पेमेंट सुविधेप्रमाणेच सेक्युरिटी देण्यात आली आहे. तुम्हाला या रिंगच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी आणि यामध्ये पैसे लोड करण्यासाठी एक ॲप ओपन करावे लागेल. परंतु पेमेंट करण्यासाठी या ॲपची गरज भासणार नाही. या रिंगच्या माध्यमातून तुम्ही सुरुवातीला 10,000 रुपयांपर्यंत महिन्याला ट्रांजेक्शन करू शकतात. यासोबतच प्रीपेड वॉलेट सेट करण्याची सुविधा देखील यामध्ये आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ KYC व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत दर महिन्याला ट्रांजेक्शन करण्याची सुविधा मिळेल.

स्मार्ट रिंग वापरणे आहे सुरक्षित

7 RING ही स्मार्ट रिंग डेव्हलप करताना बऱ्याच गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. जेणेकरून ही स्मार्ट रिंग वापरणे सुरक्षित राहील. समजा तुमच्याकडून ही स्मार्ट रिंग हरवली तर तुम्हाला ही रिंग ब्लॉक करण्याची सुविधा देखील मिळेल. या सोबतच ट्रांजेक्शन आणि लिमिट  देखील तुम्ही कंट्रोल करू शकतात. या रिंगच्या चार्जिंग बद्दल बोलायचं झालं तर, रिंग ला चार्ज करण्यासाठी कोणतेच टेन्शन नाही. कारण जेव्हा तुम्ही पेमेंट करण्यासाठी मशीन जवळ ती स्मार्ट रिंग घेऊन जाल, तेव्हा आपोआप  मशीनच्या माध्यमातून रिंग मध्ये पावर निर्माण होईल. म्हणजेच तुम्हाला वेगळे चार्जिंग करण्याची गरज नाही.

अशा पद्धतीने करा पेमेंट

7 RING च्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी तुम्हाला स्मार्ट रिंग घातलेल्या तळ हाताची मूठ बंद करावी लागेल. त्यानंतर या स्मार्ट रिंगला पेमेंट मशीन जवळ घेऊन जा. त्यानंतर तुमचे पेमेंट होईल. परंतु तुम्ही  मूठ बंद न करता पेमेंट करण्याचा प्रयत्न करत असाल तर, तुमचे पेमेंट होणार नाही. जेणेकरून  फ्रॉड होण्यापासून वाचेल. यासोबतच 7 RING फक्त UPI पेमेंट ऑप्शनला सपोर्ट करते. आणि ही पेमेंट सुविधा फक्त भारतामध्येच मर्यादित आहे.