Tata ने 12995 रुपयांत लाँच केली सायकल; पहा काय फीचर्स मिळतात

टाइम्स मराठी । टाटा इंटरनॅशनल ची सहाय्यक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्ट्राईडर सायकल्सने नवीन सायकल लॉन्च केली आहे. या नवीन सायकलचे नाव Contino Noisy Boy Bicycle असे आहे. ही सायकल परफॉर्मन्स आणि स्टाईलला लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ही स्कूटर ऍथलेटो पर्यंत सर्व स्तरांवर यूजर्सच्या गरजा पूर्ण करू शकते. यामध्ये आकर्षक डिझाईन देण्यात आली आहे. या सायकलच्या  किमती बद्दल बोलायचं झालं तर, कंपनीने ही सायकल 12,995 रुपयांमध्ये लॉन्च केली आहे. जाणून घेऊया या सायकलचे स्पेसिफिकेशन.

   

फीचर्स

Contino Noisy Boy Bicycle ही सायकल BMX रायडिंगसाठी डिझाईन करण्यात आली आहे. यामध्ये BMX हँडलबार, 360 डिग्री फ्री स्टाईल रोटर देण्यात आले आहे. जेणेकरून रायडर्स ला युनिक कंट्रोल मिळेल. यासोबतच कंपनीने यु ब्रेक्स रायडिंग वर जास्त कंट्रोल दिला आहे. त्यामुळे सुरक्षित आणि रोमांचक राइडचा अनुभव चालकाला मिळू शकेल. यामध्ये आकर्षक डिझाईन देण्यात आली असून स्टाईल आणि सबस्टेंस फ्युजन देण्यात आले आहे.

ग्रॅव्हिटी डिफाइन स्टंट साठी अप्रतिम

Contino Noisy Boy Bicycle ही सायकल BMX एडवेंचर आणि ग्रॅव्हिटी डिफाइंग स्टंट साठी अप्रतिम असेल. या सायकलच्या लॉन्चिंग सोबतच कंपनीने ऑफर्स देखील उपलब्ध केली आहे जेणेकरून ग्राहक कमी किमतीमध्ये ही सायकल खरेदी करू शकतील. त्यानुसार जर तुम्ही ही सायकल कंपनीच्या अधिकारीक वेबसाईट आणि अमेझॉन शॉपिंग ॲप वरून खरेदी करणार असाल तर तुम्हाला 4,335 रुपयांची सूट देण्यात येत आहे. एवढेच नाही तर 3500 रुपयांचे फ्री गिफ्ट देखील यासोबत मिळेल.

स्टेट ऑफ द आर्ट मटेरियल वापरण्यात आले

या सायकलच्या लॉन्चिंग वर  STRYDER CYCLES चे बिझनेस हेड राहुल गुप्ता यांनी सांगितलं की, भारतामध्ये BMX रायडिंग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नोईजी बॉईज सायकल डेव्हलप करत असताना  प्रत्येक गोष्टीवर आणि अचूकते वर लक्ष देण्यात आले आहे. यामध्ये स्टेट ऑफ द आर्ट मटेरियल आणि मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स चा वापर करण्यात आला असून सायकल अत्यंत टिकाऊ आहे.