Coolpad Cool 20+ मोबाईल लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । Coolpad कंपनीने चिनी मार्केटमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Coolpad Cool 20+ असे या मोबाईलचे नाव असून कंपनीने या मोबाईल मध्ये वेगेवेगळे फीचर्स दिले आहेत. हा स्मार्टफोन काळ्या आणि निळ्या रंगात उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये  HD + वॉटर ड्रॉप डिस्प्ले मिळेल. कंपनीने या मोबाईलच्या किमती बद्दल खुलासा केला नसून लवकरच हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

Coolpad Cool 20+ मध्ये  6.52 इंच  IPS LCD + वॉटर ड्रॉप डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1600×720 पिक्सल रिझोल्युशन आणि  89.2% स्क्रीन टू बॉडी रेशो ऑफर करतो. या डिस्प्ले सोबत डबल साईडेड 2.5 D ग्लास सपोर्ट मिळतो. या मोबाईल मध्ये Mediatek Helio G85 चिपसेट देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारित coolOS 2 वर काम करतो. यासोबतच स्मार्टफोनमध्ये 4500 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 10 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा सेटअप- Coolpad Cool 20+

Coolpad Cool 20+ या स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचं झालं तर, या मोबाईलच्या पाठीमागील बाजूला f/1.8 अपर्चरसह 48 MP प्रायमरी कॅमेरा, 0.3 MP पोट्रेट ब्लर कॅमेरा, आणि समोरील बाजूला 5 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाईल मध्ये 4 GB रॅम सह 64 GB /128 GB स्टोरेज आणि 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज ऑप्शन उपलब्ध आहे.

 कनेक्टिव्हिटी फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये हायब्रीड ड्युअल सिम सपोर्ट,4G LTE, ब्लूटूथ  हे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतील. COOLPAD  कंपनीने या मोबाईलच्या किमती बद्दल अजून खुलासा केलेला नाही. लवकरच याबाबत अधिकृत माहिती कंपनी जाहीर करेल.