Coolpad Grand View Y60 : स्वस्तात लाँच झाला 8GB रॅमवाला मोबाईल; बाजारात घालणार धुमाकूळ

Coolpad Grand View Y60 । चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Coolpad ने नुकताच आपला नवा मोबाईल Coolpad Grand View Y60 लाँच केला आहे. सर्वसामान्य ग्राहकांना परडवेल अशा किमतीत कंपनी हा मोबाईल बाजारात आणला आहे. तुम्हाला या मोबाईल मध्ये 5000mAh ची बॅटरी, ५० मेगापिक्सल कॅमेरा यांसारखे बरेच फीचर्स मिळतील. चला तर मग जाणून घेऊयात Coolpad च्या मोबाईल बाबत सर्वकाही

   

काय आहेत फीचर्स – Coolpad Grand View Y60

Coolpad Grand View Y60 मध्ये 60Hz रीफ्रेश रेट सह 6.745-इंचाचा डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 400 nits पीक ब्राइटनेस ऑफर करतो. या स्मार्टफोनचे वजन 193 ग्रॅम आहे. हा मोबाईल COOLOS 3.0 वर काम करतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Coolpad Grand View Y60 मध्ये 13-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 0.08MP चा सेकंडरी कॅमेरा आणि समोरील बाजूला 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये 5000mAh ची बॅटरी असून ही बॅटरी 18W फास्ट चार्जर ला सपोर्ट करते.

किंमत किती ?

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Coolpad Grand View Y60 च्या 4GB + 128GB व्हेरिएन्टची किंमत 999 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 11,700 रुपये आहे. तर 6GB + 128GB व्हेरिएन्टची किंमत 1099 युआन म्हणजेच सुमारे 12,900 रुपये आणि 8GB + 128GB स्टोरेज मोबाईलची किंमत 1299 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 15,000 रुपये आहे. हा मोबाईल तुम्ही निळया आणि कार्बन ब्लॅक रंगात उपलब्ध आहे.