मिनी इंडियाने लॉन्च केली छोटी Electric Car; 270 KM रेंज, किंमत किती?

टाइम्स मराठी । मिनी इंडिया कंपनीने नुकतीच आपली Cooper SE EV ही चार्ज्ड एडिशन लॉन्च केली आहे. परंतु कंपनीने लिमिटेड युनिट सेल साठी उपलब्ध केली असल्यामुळे खूपच कमी ग्राहक हे आत्ता खरेदी करू शकतात. यासोबतच भारतामध्ये ही कार कम्प्लीटली बिल्ड युनिट च्या माध्यमातून आणण्यात आली आहे. या एडिशन ची किंमत 55 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत असून जर तुम्ही ही कार खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला लवकरात लवकर खरेदी करावी लागेल.

   

लूक आणि डिझाईन –

Cooper SE EV या एडिशनमध्ये चिली रेड कलर वेरिएंट उपलब्ध करण्यात आला आहे. या कारच्या बोनेटवर लाल पट्ट्या देण्यात आल्या आहेत. टेलगेट्स आणि दरवाजांवर पिवळ्या पट्ट्या देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे कारला अतिशय स्पोर्टी लुक मिळतो. कंपनीने या कारच्या इंटरियर मध्ये कोणताच बदल केलेला नसून या कारचा स्टॅंडर्ड व्हर्जन प्रमाणेच यात इंटरियर आहे. या इंटरियरची थीम ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध असून येल्लो एक्सेंटसह उपलब्ध आहे. Cooper SE EV या कारमध्ये चाल्ड एडिशन मध्ये मल्टिपल टागल स्वीच आणि मीडिया कंट्रोल एकाच सर्किल मध्ये दिले आहे. यासोबतच सर्किलमध्ये टच स्क्रीन देखील देण्यात आली आहे. याशिवाय या गाडीत 17 इंच अलॉइस व्हील्स वापरण्यात आलेले असून या विल्स वर येल्लो स्ट्रीप लावण्यात आली आहे. या सर्व गोष्टींमुळे ही कार खूपच आकर्षक दिसते.

270 किलोमीटर रेंज –

Cooper SE EV या कारच्या चार्ज्ड एडिशन मध्ये 184 HP पावर देण्यात आलेली असून ही पावर 270 NM टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 32.6kwh बॅटरी देण्यात आलेली असून यामुळे फ्रंट व्हील्सला पावर मिळते. त्याचबरोबर Cooper SE EV ही कार 7.3 सेकंदात 100kmph स्पीड प्रदान करते. या कारची WLTP सर्टिफाइड रेंज ही 270 किलोमीटर असून सुपरफास्ट चार्जिंगने परिपूर्ण आहे. तुम्ही ही कार 50kw DC चार्जर च्या माध्यमातून 36 मिनिटांमध्ये 0-80 टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकतात. तर 11 kw च्या वालबाक्स चार्जरच्या माध्यमातून 2.30 तासांत 80% चार्ज करू शकता.