क्रिकेटचं वेड हेच का? पोरांनी चक्क रेल्वे स्टेशनवर मांडला डाव (Video)

टाइम्स मराठी | सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी एंटरटेनमेंट करतात तर कधी घडलेल्या घटनांची माहिती देतात. बऱ्याचदा मुलांचे टॅलेंट देखील यावरून समजते. आपण प्रवासासाठी जात असताना बऱ्याचदा ट्रेन येण्यासाठी प्रचंड उशीर होतो. अशावेळी आपण सर्वजण बोर होऊन जातो. आणि बऱ्याचदा चिडचिड देखील होते. परंतु यावर युक्ती लढवत या विद्यार्थ्यांनी रेल्वे स्टेशन वरच क्रिकेट (Cricket) खेळण्यासाठी सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

   

या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, एका रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत सर्वजण बसले आहेत. परंतु या ठिकाणी असलेले मुलं ट्रेन लवकर येत नसल्यामुळे क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. या रेल्वे स्टेशन स्थानकावर पाहणाऱ्यांची भूमिका घेणारे देखील मोठ्या प्रमाणात असून आपण रेल्वे स्टेशनवर आहोत याचे भान देखील या मुलांना नसेल. बिनधास्तपणे ते रेल्वे स्टेशनवर त्यांचा वेळ घालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओ पाहताना प्रत्येकाला आनंद होत असेल.

हा व्हिडिओ ढाकातील मोहनगंज या ठिकाणी असलेल्या रेल्वे स्टेशन वरील असून विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी या स्टेशनवर क्रिकेट खेळत आहे. हा व्हिडिओ ESPNcricinfo या अकाउंट वरून शेअर करण्यात आलेला आहे. यासोबतच अतिशय सुंदर पद्धतीने त्याला कॅप्शन देखील देण्यात आले आहे. या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ट्रेनची वाट पाहत बसण्यापेक्षा क्रिकेट खेळणे हा अत्यंत चांगला पर्याय आहे. या ट्विटर पोस्टवर बऱ्याच जणांनी कमेंट देखील केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या माध्यमातून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आपण पाहू शकतो.