Meta ने केली मोठी घोषणा; Facebook- Instagram मधील क्रॉसॲप कम्युनिकेशन होणार बंद 

टाइम्स मराठी । सोशल मीडिया कंपनी Meta ने Facebook आणि Instagram बद्दल मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता कंपनी लवकरच फेसबुक आणि इंस्टाग्राम यामधील  क्रॉस ॲप कम्युनिकेशन बंद करणार आहे. म्हणजे आता तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत चॅटिंग करायचं असेल तर मेसेंजर किंवा फेसबुक स्विच करावे लागेल. यापूर्वी  इंस्टाग्राम वरून फेसबुक वर किंवा फेसबुक वरून इंस्टाग्राम वर मेसेज करता येत होते. परंतु आता तसं होणार नाही. हा बदल याच महिन्यात करण्यात येणार आहे.

   

 जुने चॅटिंग राहील सुरक्षित

फेसबुक इंस्टाग्राम यामधील क्रॉस ॲप कम्युनिकेशन बंद झाल्यानंतर फेसबुक युजर्स इंस्टाग्राम वर डायरेक्ट मेसेज पाठवू शकणार नाही. परंतु यामुळे दोन्ही ॲप्सवर मिळून केलेल्या चॅटला कोणता धक्का लागणार नाही. म्हणजेच तुम्ही केलेलं चॅटिंग सुरक्षित राहील असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. एवढेच नाही तर तुम्ही ते जुने चॅट वाचू शकता, परंतु रिप्लाय देऊ शकणार नाही. यासोबतच यानंतर एखाद्या इंस्टाग्राम युजर्स ला फेसबुक युजर सोबत चॅट करायचं असेल तर मेसेंजर वापरणे गरजेचे ठरेल.

दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला एकत्र करण्याचा निर्णय मागे

 2020 या वर्षांमध्ये मेटा या सोशल मीडिया कंपनीने इंस्टाग्राम साठी मेसेंजर सपोर्ट उपलब्ध केला होता. त्यानुसार फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट मध्ये क्रॉस प्लॅटफॉर्म मेसेजिंग सुरू करण्यात आले होते. परंतु आता तीन वर्षानंतर कंपनीने दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला एकत्र करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यासोबतच लवकरच मेसेंजर मध्ये एक नवीन फिचर  मेटा ऍड करणार आहे.

मेटा लवकरच मेसेंजर मध्ये एंड टू एंड एनक्रीप्शन फीचर जोडणार आहे. हे फीचर  या वर्षाच्या अखेरीस लॉन्च करण्यात येऊ शकते. इंस्टाग्राम सपोर्ट पेजवर कंपनीने 1 डिसेंबर पासून क्रॉस ऐप कम्युनिकेशन चॅट बंद करण्यात येणार असल्याची माहिती दिली. सध्या इंस्टाग्राम आणि फेसबुक चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यासोबतच क्रॉस ॲप कम्युनिकेशनच्या मदतीने युजर्स मोठ्या प्रमाणात फेसबुक आणि इन्स्टा वर चॅटिंग करत होते. परंतु तीन वर्षानंतर मेटा क्रॉस मेसेजिंग बंद करणार असल्यामुळे यूजर्स कशा पद्धतीने हा बदल स्वीकारतील हे पाहणे योग्य ठरेल.