मेटॉलिक डिझाईनमध्ये लाँच झालं परवडणारे स्मार्टवॉच; महिलांसाठी ठरेल पहिली पसंत

टाइम्स मराठी ।आज काल वेगवेगळ्या डिझाईन मध्ये उपलब्ध असलेल्या वॉच पेक्षा स्मार्टवॉच खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे. आपण बऱ्याच स्मार्टवॉच प्लेन डिस्प्ले आणि बेल्ट मध्ये उपलब्ध असल्याचे पाहतो. परंतु तुम्ही अप्रतिम डिझाईन मध्ये स्मार्टवॉच पाहिली आहे का? आता मेटालिक डिझाईन सह CROSSBEAT DIVA या कंपनीने नवीन स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. हे स्मार्टवॉच कंपनीने महिला युजर्सच्या चॉईस कडे स्पेशली लक्षात ठेवून डिझाईन केली आहे. कंपनीने हे स्मार्टवॉच 4000 रुपयांपेक्षाही कमी किमतीमध्ये उपलब्ध केली आहे. जाणून घेऊया या स्मार्टवॉच चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

CROSSBEAT DIVA या स्मार्टवॉच मध्ये 1.28 इंच always on AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 700 नीट ब्राईटनेस ऑफर करतो. ही स्मार्टवॉच सिंगल चार्ज वर 7 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ देते. या स्मार्ट वॉश मध्ये 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स स्पोर्ट्स उपलब्ध असून 100 पेक्षा जास्त कष्टमाइजिबल वॉच फेस देखील देण्यात आले आहे. हे स्मार्टवॉच लो लेटेन्सी कनेक्शन प्रोव्हाइड करते.

फीचर्स

CROSSBEAT DIVA या स्मार्टवॉच मध्ये अलार्म, कॅल्क्युलेटर, रिमाइंडर, स्टॉप वॉच, वेदर अपडेट, म्युझिक, कॅमेरा कंट्रोल यासारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहे. या सोबतच ब्लूटूथ सपोर्ट देखील उपलब्ध आहे. कष्टमायजेबल वॉच फेस सह, वॉच रोटेटिंग क्राऊन फिचर देखील यामध्ये मिळते. हे स्मार्टवॉच FitCloud Pro ॲपच्या माध्यमातून कंट्रोल करता येते. त्याचबरोबर या स्मार्टवॉचमध्ये बरेच हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स उपलब्ध आहे. यात हार्ट रेट सेंसर, Spo2, Sleep आणि ब्लड प्रेशर यांचा समावेश होतो.

डिझाईन

CROSSBEAT DIVA  या स्मार्टवॉचच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये स्टोन स्टडेड डिझाईन देण्यात आली आहे. ही डिझाईन स्मार्टवॉचला  स्टाईलिश लूक देते. यामध्ये IP67 रेटिंग देण्यात आली आहे. म्हणजेच ही स्मार्टवॉच तुम्ही पाण्यामध्ये आणि कोणत्याही सिच्युएशन मध्ये वापरू शकतात. या स्मार्टवॉच मध्ये देण्यात आलेले ब्लूटूथ कॉलिंग फीचर अप्रतिम आहे. या फिचरच्या मदतीने स्मार्टवॉच वरूनच कॉल करता येऊ शकतो.

किंमत

CROSSBEAT DIVA ही स्मार्टवॉच कंपनीने भारतात 3499 मध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये रोज गोल्ड आणि सिल्वर कलर ऑप्शन उपलब्ध आहे. तुम्ही देखील हे स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अमेझॉन इंडिया आणि क्रॉसबिट्स वेबसाईट च्या माध्यमातून खरेदी करू शकतात. क्रॉसबिट्सने  काही दिवसांपूर्वी ChatGPT सह क्रॉसबिट नेक्सन स्मार्टवॉच लॉन्च केली होती.