टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये ChatGPT सह एक स्मार्टवॉच लाँच करण्यात आलं आहे. Crossbeat Nexus असे या स्मार्टवॉचचे नाव असून ChatGPT सह लाँच झालेले देशातील पहिलेच स्मार्टवॉच आहे. कंपनीने या या स्मार्टवॉच मध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध केले असून हे स्मार्ट वॉच सिल्वर आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये खरेदी करता येणार आहे. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टवॉच चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.
फिचर्स
Crossbeat Nexus या स्मार्टवॉच मध्ये AMOLED 2.1 इंच डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमध्ये 500 पेक्षा जास्त कस्टमायझेशन ऑप्शन उपलब्ध आहेत. या क्रॉसबिट्स नेक्सस मध्ये GPS डायनामिक रूट ट्रेकिंग सुविधा, डायनामिक आयलँड, ebook रीडर यासारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहे. तुम्हाला या स्मार्टवॉचच्या माध्यमातून ब्लूटूथ कॉलिंग सुद्धा करता येऊ शकते. Crossbeat च्या या स्मार्टवॉच मध्ये यूजर साठी फिरणारा क्राऊन देण्यात आला आहे.
किंमत किती?
Crossbeat Nexus हे स्मार्टवॉच दोन कलर ऑप्शन मध्ये मिळते. त्यानुसार ब्लॅक आणि सिल्वर कलर ऑप्शन मध्ये तुम्ही हे स्मार्टवॉच खरेदी करू शकतात. या स्मार्टवॉच ची किंमत भारतीय बाजारात 5999 रुपये आहे. तुम्ही हे स्मार्टवॉच प्री ऑर्डर देखील करू शकतात. या स्मार्टवॉच ची प्री ऑर्डर केल्यास ग्राहकांना फ्री मध्ये तीन गार्ड उपलब्ध करण्यात येणार आहे. यासोबतच या स्मार्टवॉच वर कंपनीकडून सहा महिन्यांची वॉरंटी आणि पाच टक्के डिस्काउंट देखील देण्यात येत आहे.