टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये टिकाऊ स्मार्टफोनची मोठ्या प्रमाणात चलती आहे. अशातच रग्ड फोन बनवणारी कंपनी Cubot ने नवीन टिकाऊ मोबाईल लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे नाव Cubot Kingkong 8 आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये अप्रतिम फीचर्स आणि दमदार बॅटरी उपलब्ध केली आहे. त्याचबरोबर या मोबाईलमध्ये उपलब्ध असलेला टॉर्च अप्रतिम प्रकाश देतो. हा स्मार्टफोन युरोपमध्ये खरेदी करण्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यानुसार या मोबाईलची किंमत 20,000 रुपये एवढी आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.
Cubot KingKong 8 या स्मार्टफोनमध्ये 10,600 Mah बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी एका दिवसामध्ये जास्त बॅटरी लाइफ देते. या मोबाईल मध्ये 6000 लुमेन अधिकतम ब्राईटनेस एफिशियन्सी आहे. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत हा स्मार्टफोन स्पष्टता दाखवतो.Cubot Kingkong 8 या स्मार्टफोनची साईज 169.9×80.2 mm एवढी आहे. त्याचबरोबर याचे वजन 0.382 किलोग्रॅम आहे. Cubot Kingkong 8 या मोबाईलमध्ये 4 CORTEX A73 CORE आणि 4 CORTEX A53 CORE यासह ऑक्टाकोर चिपसेट वापरण्यात आले आहे. ही चिपसेट हाय क्वालिटी एप्लीकेशन आणि गेम यासाठी अप्रतिम पर्याय आहे. या स्मार्टफोन मध्ये 6 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. हे स्टोरेज मायक्रो SD कार्ड च्या माध्यमातून 512 GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
स्पेसिफिकेशन
Cubot Kingkong 8 या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंच HD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले अप्रतिम ब्राईटनेस प्रदान करतो. तुम्ही हा स्मार्टफोन पाणी किंवा धूळ कोणत्याही परिस्थितीत वापरू शकतात. या स्मार्टफोनला IP68 आणि IP69K सर्टिफिकेशन देण्यात आले आहे. हा मोबाईल अँड्रॉइड 13 वर बेस्ड असून ड्युअल सिम सेटअप सह उपलब्ध करण्यात आला आहे.
कॅमेरा
या स्मार्टफोनमध्ये 48 MP प्रायमरी कॅमेरा आणि 16 MP फ्रंट फेसिंग कॅमेरा सपोर्ट उपलब्ध आहे. हा कॅमेरा अप्रतिम फोटोज कॅप्चर करण्यासाठी सक्षम आहे. यामध्ये सिक्युरिटी साठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे या स्मार्टफोन मध्ये दोन LED उपलब्ध आहेत. त्यापैकी एक LED लाईट टॉर्च ला पावरफुल बनवतो.