इंटरनेट शिवाय मोबाईल वर पाहता येणार TV; कसे ते पहा

टाइम्स मराठी । इकॉनोमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार सरकारने नवीन प्लॅन आणला आहे. या प्लान च्या माध्यमातून आपण आता इंटरनेट शिवाय मोबाईलवर टीव्ही पाहू शकतो. मोबाईल फोन युजर्स ला आता त्यांच्या मोबाईलवर केबल किंवा डीटीएच कनेक्शन च्या माध्यमातून टीव्ही पाहण्याची परवानगी दिली जाणार आहे. हे सर्व शक्य आहे फक्त डायरेक्ट टू मोबाईल म्हणजे D2M या टेक्नॉलॉजी मुळेच.

   

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दूरसंचार विभाग, माहिती प्रसारण मंत्रालय आणि कानपूर IIT या टेक्नॉलॉजी वर काम करत आहे. या टेक्नॉलॉजीच्या प्रस्तावाला टेलीकॉमर ऑपरेटर कडून नकार घंटा येऊ शकते. कारण त्यांच्या व्यवसायासाठी हे धोकादायक असून यामुळे 5G व्यवसायाचे मोठ्या नुकसान होऊ शकतं. अहवाला नुसार DoT, MIB, IIT कानपुर चे अधिकारी आणि दूरसंचार प्रसारण उद्योगांचे प्रतिनिधी या टेक्नॉलॉजी संदर्भातील बैठकीला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर आम्ही व्यवहार्यता तपासात असून दूरसंचार ऑपरेटरसह सर्व भागधारकांची बैठक घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

डायरेक्ट टू मोबाईल म्हणजेच D2M ह्या टेक्नॉलॉजी वर सध्या काम सुरू असुन ही टेक्नॉलॉजी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागेल. D2M ही टेक्नॉलॉजी रेडिओ प्रमाणेच काम करतो. D2M टेक्नॉलॉजी चा वापर ओटीपी प्लॅटफॉर्म मल्टीमीडिया कंटेंट प्रदान करण्यासाठी करू शकतात. त्याचबरोबर प्रसार भारतीय सध्या टीव्ही प्रसारणासाठी 526 -582 मेगाहर्टज हा ब्रँड वापरते. हाच ब्रँड मोबाईल आणि ब्रॉडकास्ट या दोन्ही सेवांसाठी या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काम करेल.

टेक्नॉलॉजीमुळे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना इंटरनेट न वापरता ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मल्टीमीडिया कंटेंट पाहण्याचा चांगला ऑप्शन निर्माण होईल. यामुळे ग्राहकांचा मोबाईल डेटा वरील खर्च देखील कमी होऊ शकतो. एवढेच नाही तर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांनाही याचा मोठा फायदा होऊ शकतो. ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी इंटरनेट नसल्यामुळे बऱ्याच समस्या येतात. त्यामुळे या नवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीने ग्रामीण भागात देखील बिना इंटरनेट व्हिडिओ पाहता येईल. एवढेच नाहीतर ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून अभ्यासासाठी देखील मदत होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज वेगवेगळ्या कृषी पद्धतींची माहिती देखील विना इंटरनेट मिळू शकेल.