चंद्रावर गाडी चालवणारा अवलिया; 546 तास अंतराळात केला प्रवास

टाइम्स मराठी । सध्या भारताचे चंद्रयान (Chandrayaan 3) चंद्राच्या कक्षेमध्ये भ्रमण करत असून काही दिवसातच ही मोहीम अंतिम वळणावर पोहोचेल. सर्वांचा चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंगकडे लक्ष लागून आहे. भारताची ही तिसरी चंद्रयान मोहीम असून 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. अशातच नागरिकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहे. एवढेच नाही तर चांद्रयानावर सर्वच जणांचे लक्ष लागून आहे. चंद्रावर (Moon) पाणी, जीवन, तेथील वातावरण कसं असेल हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतील. याबाबत शोध घेणे अजूनही सुरू आहे. हे सगळं सुरु असताना तुम्हाला कोणी म्हंटल की जर चंद्रावर गाडी चालवायची संधी मिळाली तर? कदाचित तुम्ही प्रश्न विचारणाऱ्याला वेड्यात काढाल. परंतु तुम्हाला माहित आहे का? एका व्यक्तीने 3.84 लाख किलोमीटर दूर असलेल्या चंद्रावर कार देखील चालवली होती. चला तर जाणून घेऊया.

   

कोणी चालवली चंद्रावर गाडी?

1971 मध्ये अपोलो 15 या मिशन दरम्यान चंद्राच्या भूभागावर एका व्यक्तीने गाडी चालवली होती. या व्यक्तीचं नाव आहे डेव्हिड रैडॉल्फ स्कॉट. (David Scott) या व्यक्तीने 546 तास आणि 54 मिनिटं अंतराळात सफर केली . त्यांनी चंद्रावर चालवलेली ही कार साधारण कार नसून एक मून रोवर व्हेईकल होतं. सध्या याच मुन रोवर व्हेईकल च्या माध्यमातून चंद्रावर शोध घेण्यास मदत होत आहे. डेव्हिड रैडॉल्फ स्कॉट हे चंद्रावर वाहन चालवणारे पहिले व्यक्ती बनले होते. त्यांचा जन्म 6 जून 1932 मध्ये झाला होता. ते अमेरिकी इंजिनियर टेस्ट पायलट होते. अपोलो 15 या मिशनच्या चौथ्या मानव मुन लँडिंगने चंद्रावर पाऊल ठेवणारे डेव्हिड रैडॉल्फ स्कॉट सातवे व्यक्ती होते.

कॅनडा स्पेस सेंटर मधून घेतली अंतराळात भरारी –

1963 मध्ये नासाने अंतराळात भरारी घेण्यासाठी तिसरा ग्रुप निवडला होता. हा ग्रुप म्हणजे स्कॉट ग्रुप 3. या ग्रुप मध्ये कमान सांभाळणारे डेव्हिड रैडॉल्फ स्कॉट हे पहिले व्यक्ती होते. कमांडर नील आर्मस्ट्रॉंग यांच्यासोबत डेव्हिड रैडॉल्फ स्कॉट यांनी 16 मार्च 1966 च्या फ्लाईटचे संचालन देखील केले होते. यामुळे त्यांना मुन मिशनचा अनुभव होता. 26 जुलै 1971 ला अपोलो 15 सकाळी 9 वाजून 34 मिनिटांनी लोरीडा येथील कॅनडा स्पेस सेंटर येथून लॉन्च करण्यात आले होते. या मिशनमध्ये डेव्हिड रैडॉल्फ स्कॉट, लुनर मोड्युल पायलट जेम्स इरवीन, आणि कमांड मोड्युल पायलट अल्फ्रेड वर्डेन हे देखील उपस्थित होते. सुमारे चार दिवसांच्या प्रवासानंतर डेव्हिड रैडॉल्फ स्कॉट आणि इरविन हँडली यांची टीम रिले नावाच्या खोऱ्याजवळ एपेनीन पर्वताच्या पायथ्याशी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरली. त्यानंतर या टीमने सर्वात पहिले मून रोवरच्या मदतीने आजूबाजूच्या भागांचे निरीक्षण केले आणि त्यांना लुनर मॉड्युल च्या पलीकडे प्रवास करण्याची परवानगी मिळाली. यावेळी त्यांनी चंद्रावर पसरलेल्या हेडली रिले आणि अपेनाईन पर्वताच्या काही भागांचे सेलेनोलॉजिकल निरीक्षण केले. या निरीक्षणासाठी काही साहित्य घेऊन जाण्यास त्यांनी रोवर 1 चा वापर केला. यावेळी त्यांनी चंद्रावर असलेले 82 किलोग्राम साहित्य गोळा केलं होते.

चंद्राच्या पृष्ठभागावर अगदी सहज धावली कार –

चंद्रावर असलेले हे लुनर रोवीन व्हीकलला मुन बग्गी देखील म्हंटल जाते. ते 1969 पासून विकसित केलं जात आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना लुनर रोवीन व्हिकलचे वजन 209 किलो एवढे होते. त्यानंतर दोन अंतराळवीर आणि उपकरणे घेऊन जाताना त्याचे वजन 700 किलो एवढे होते. या गाडीच्या प्रत्येक चाकात 200 W क्षमता असलेली इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली होती. या गाडीला दहा ते बारा किलोमीटर प्रति तास या स्पीडने चालवले जात होते. त्यावेळी ही अनोखी कार बनवण्यासाठी 17 महिने लागले होते. मात्र ती चंद्राच्या पृष्ठभागावर अगदी सहज धावू शकत होती.