दिवस कसा उजडतो आणि रात्र कशी होते? पहा संपूर्ण जगाचा Video

टाइम्स मराठी । सकाळ, दुपार आणि रात्र हे कशा पद्धतीने होत असेल याचा तुम्ही नक्कीच विचार केला असेल. आपण पृथ्वीवर राहून सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर उठून सकाळ कशी होते हे पाहिलं असेल. परंतु ही सकाळ म्हणजेच दिवस आणि रात्र झाल्यावर अवकाशातून कशी दिसत असेल हे पाहिलं आहे का? असाच नजरेचे पारणे फेडणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ टाईम लॅप्स मोमेंटअसून यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे की, पृथ्वी वरील दिवस आणि रात्र हे आकाशातून कशा पद्धतीने दिसते.

   

या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, ट्वाइलाइट ही एक हलणारी रेषा असून ही ग्रहांच्या पृष्ठभागावर दिवसाचा भाग आणि गडद रात्रीचा भाग विभाजित करत असते. एखाद्या ग्रह किंवा चंद्रावरील त्या बिंदूचे स्थान म्हणजेच ही टर्मिनेटर लाईन. त्याच्यामुळे ताऱ्याच्या मध्यभागी जाणारी ही रेषा त्याला स्पर्श करते. आणि मध्यभागी ही ओळ ठेवून दिवस आणि रात्रीचा हा सुंदर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दिवस आणि रात्र यांच्यातील विभाजक रेषेला टर्मिनेटर आणि व्टायलाईट झोन म्हटले जाते. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ एकाच ठिकाणावरून नाही तर बऱ्याच ठिकाणावरून रेकॉर्ड करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला एक भाग हा अलास्का येथील आहे. या या व्हिडिओमध्ये पोलर रीजन येथून सूर्योदय आणि सूर्यास्त टिपण्यात आला आहे. या ठिकाणी 6 महिन्यापासून रात्र झालेली नाही. म्हणजे या ठिकाणी चंद्र उगवलेला नाही. आणि सूर्य मावळत देखील नाही. अशा वातावरणामध्ये या ठिकाणी राहणारे लोक सूर्यास्ताशिवाय जीवन जगतात. आणि त्यांच्या वेळापत्रकानुसार झोपतात आणि उठतात. नासाच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरून हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. हा टाइम लॅप्स नासाच्या Earth Science and Remote Sensing Unit यांनी रेकॉर्ड केलेला आहे.