बिना लाईटचा चालेल AC! वीजबिलापासून मिळेल मुक्ती, फक्त घरी घेऊन या ‘हे’ छोटं डिव्हाईस

टाइम्स मराठी टीम । सध्या उन्हाळ्याचे दिवस असून घरी, ऑफिसमध्ये सतत पंखा किंवा AC सुरु ठेवावा लागत आहे. यामुळे अव्वाच्यासव्वा वीजबिल येऊन अनेकांची आर्थिक चणचण होताना दिसतेय. आता यावर एक भन्नाट उपाय निघाला आहे. बिना लाईटचा AC चालू शकतो असं तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल का? पण आता असं एक डिव्हाईस बाजारात आलं आहे जे तुमच्या घराची वीजबिलाची रक्कम वाचवू शकते.

   

BYD Electronics आणि UGREEN ने सोबत येऊन Star Outdoor Power Supply GS2200 हे अत्याधुनिक उपकरण विकसित केलं आहे. ज्यावर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालतील. GS2200 उपकरणाची किंमत ८० हजार रुपये असून या उपकरणावर टीव्ही, कूलर यासारखे उपकरणेही चालतील.

हे उपकरण नक्की काय काम करतं?

या उपकरणात DC आउटपुट साठी यूएसबी-ए इंटरफेस, टाइप-सी इंटरफेस, डीसी5521 इंटरफेस, 1 सिगारेट लाइटर पोर्ट यांचा वापर केलेला आहे. तसेच यात AC आउटपुट साठी एसी पोर्ट देखील आहेत. GS2200 या उपकरणामध्ये बॅटरी चा देखील वापर केलेला असून या उपकरणाची बॅटरी स्थिर आणि सुरक्षित आहे. तसेच या बॅटरी ची क्षमता देखील खूप चांगली आहे.

अगदी कमी कालावधीत चार्जिंग होणे आणि जास्त क्षमता हे सुद्धा या आधुनिक उपकरणाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. GS2200 हे उपकरण फक्त 1.5 तासांच्या वेळेत पूर्णपणे चार्जिंग होऊ शकते, कारण हे PowerZip फ्लॅश या टेकनिक सोबत उपलब्ध आहे. PowerZip फ्लॅश या टेक्निक मुळे GS2200 हे जलद गती ने चार्जिंग होते व क्षमता देखील चांगली देत आहे.

GS2200 चे आणखी एक वैशिष्ट म्हणजे हे उपकरण सौर पॅनेलद्वारे देखील चार्ज केले जाऊ शकते. GS2200 हे १२०० वॅट पर्यंत सौर पॅनल इनपुट चा समर्थन करते , म्हणजेच सौर पॅनेलद्वारे देखील ह्या उपकरणाची बॅटरी अगदी जलद गती ने चार्जिंग पूर्ण करू शकते. GS2200 या उपकरणाच्या या वैशिट्यांमुळे हे उपकरण खूप महत्वाचे ठरू शकते.