Desi Jugad : घराच्या छतावर लावा ‘हे’ यंत्र; आयुष्यभर येणार नाही लाईटबील, पंखा अन AC कितीही चालवा..

टाइम्स मराठी टीम । मागील काही दिवसांत महागाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस आणि वीज यांच्या किंमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या अतिकिमतींमुळे लोक चिंतेत आहेत. त्यातच गेल्याकाही महिन्यापासून वीज बिलामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला एका अशा यंत्राबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरातील विजेची बचत होऊ शकते आणि तुम्ही कोणत्याही इलेट्रॉनिक वस्तूचा मनसोक्तपणे वापर करू शकाल. ट्यूलिप टर्बाइन (Tulip Turbine) असे या यंत्राचे नाव असून याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत .

   

ट्यूलिप टर्बाइन (Tulip Turbine) म्हणजे काय

हे यंत्र दिसायला जेवढे चांगले आहे तेवढेच पैशाची बचत करण्यास देखील उपयुक्त आहे. या यंत्राचा आकार छोटा आहे असून कमी जागेमध्ये जास्त वीज निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तुम्ही हे यंत्र घरी (घराच्या छतावर), ऑफिस किंवा कोणत्याही पब्लिक ठिकाणी लावू शकता. आकारासोबतच त्याची अजून एक खासियत म्हणजे ते विविध रंगामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे तुमच्या घराला शोभेल अशा ट्यूलिप टर्बाइन रंगाची निवड करू शकाल.

ट्यूलिप टर्बाइन काम कसे करते

ट्यूलिप टर्बाइन या यंत्रावर दोन व्हर्टिकल ब्लेड असून कमी हवा असली तरी ते फिरू शकते. जेव्हा हि दोन्ही ब्लेड फिरू लागतात तेव्हा त्यापासून विजेची निर्मिती होते. त्यानंतर जनरेटरमध्ये निर्माण झालेली वीज एकत्रीत साठवली जाते आणि जेव्हा तुम्हाला गरज भासेल तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकाल.

ट्यूलिप टर्बाइनची खासियत काय ?

सौर पॅनेलच्या तुलनेत ट्यूलिप टर्बाइन हे खूप कमी जागेमध्ये बसू शकेल. तसेच सौर पॅनेलच्या कार्यक्षमता १५ % ते २०% असून ट्यूलिप टर्बाइनची कार्यक्षमता ३०% ते ३५% एवढी आहे. त्यामुळे हे यंत्र खास असून अतिशय उपयोगी आहे. तसेच ट्यूलिप टर्बाइन हे दिवस तसेच रात्री सुद्धा विजेची निर्मिती करू शकते. तसेच हे यंत्र शहर आणि ग्रामीण भागात फायदेशीर ठरणारे यंत्र आहे.

ट्यूलिप टर्बाइनसाठी किती खर्च लागेल ?

600W/1000W टर्बाइनची लावण्याचा खर्च सुमारे 85,000 रुपये आहे आणि 5kw टर्बाइनची लावण्याचा खर्च सुमारे 3,45,000 रुपये आहे. ही एकवेळची गुंतवणूक असल्यामुळे लोक त्याकडे आकर्षित होत आहेत.