Diesel Car चालवताय? ‘या’ चुका नक्कीच करू नका, अन्यथा गाडी होईल खराब

टाईम्स मराठी । भारतात तुम्हाला पेट्रोल, कार, दिसेल कार, CNG कार आणि इलेक्ट्रिक कार असा वेगवेगळ्या कार रस्त्यावर दिसतील. प्रत्येकाला जी गाडी सोयीची वाटते ती तो खरेदी करत असतो. काहींना पेट्रोल कार आवडते तर काहींना डिझेल कार जास्त कम्फरटेबल वाटते. परंतु पेट्रोल कार च्या तुलनेमध्ये डिझेल इंजिन कार चालवणं अवघड असून ही चालवताना अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. त्यातच आता देशामध्ये दुसऱ्या टप्प्यातील BS6 नियम लागू झाल्यामुळे या नियमानुसार बऱ्याच कंपन्यांनी कार मॉडेल्स मधून डिझेल इंजिन काढून टाकलेले आहे. तरीसुद्धा भारतीय बाजारपेठेत अशा बऱ्याच प्रकारचे मॉडेल्स अजूनही आहेत. एवढेच नाही तर सध्या पूर्वीपेक्षा जास्त डिझेल कार रस्त्यावर दिसताय. पेट्रोल आणि डिझेल कार चालवण्यात बराच फरक आहे. बरेचदा डिझेल कार चालवणाऱ्या चालकाकडून अनेक चुका होत असतात त्या चुका टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

   

1) गाडीचा टॅंक रिकामा ठेऊ नका-

डिझेल हे इंजिनच्या पार्टसाठी एक लुब्रिकंट म्हणून काम करतं. डिझेल टॅंक रिकामा ठेवला तर इंजिनच्या काही भागांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कारच्या इंधन टाकीमध्ये नेहमी पुरेसे डिझेल भरलेले असावे. डिझेल कमी असल्यास, इंधन पंप ज्वलन कक्ष मध्ये हवा उडवू शकतो. ज्यामुळे इंजिनच्या अंतर्गत भागांना गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते.

2) सावधानपणे इंजन सुरू करा-

पेट्रोल इंजन असलेल्या कार जास्त वेगाने सुरू केली तरी एकवेळ चालते परंतु डिझेल इंजन कार जास्त वेगाने चालू करणे अयोग्य आहे. यामुळे डीजल इंजनला मोठी अडचण येते. त्याचबरोबर इंजिनचा पिस्टन, पिस्टन रिंग, वॉल्व, सिलेंडर लवकर खराब होण्याची शक्यता असते. डीजल इंजनला सुरू केल्यानंतर इंजिनला गरम होण्यासाठी काहीवेळ देणं गरजेचे असते. त्यानंतर तुम्ही रेस वाढवू शकतात आणि इंजनची लाइफही वाढवू शकतात.

3) RPM आणि गिअरचा समतोल साधा-

कार चालवत असताना कमी RPM मुळे इंजिन आणि गिअर बॉक्स दोघांचेही नुकसान होते. कमी आरपीएममुळे इंजन वर जास्त दाब पडतो आणि इंजिनची लाईफ दूध कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे डिझेल इंजिन कारच्या युजर मॅन्युअलनुसार RPM आणि गीअरचे कॉम्बिनेशन ठेवणे आणि योग्य समतोल साधने गरजेचे आहे. नाहीतर गाडीचे नुकसान होऊ शकते,.