टाइम्स मराठी । प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी ,मारुती सुझुकी (Maruti Suzuki) फेस्टिवल सीजनमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या काही गाड्यांवर डिस्काउंट ऑफर देत आहे. यामध्ये एक्सचेंज ऑफर, कॉर्पोरेट ऑफर यासारख्या वेगवेगळ्या ऑफर्स उपलब्ध आहेत. जर तुम्ही देखील मारुती सुझुकीची कार खरेदी करू इच्छित असाल तर मारुती सुझुकी बलेनो, मारुती सुझुकी शियाज, या कार्सवर तुम्हाला 65 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.
१) MARUTI SUZUKI BALENO–
मारुती सुझुकी बलेनो ही कार 9 व्हेरीएंट आणि सात कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. या कार मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजन 90 PS पावर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकी बलेनो या कारच्या मायलेज बद्दल बोलायचं झालं तर ही कार 22.35 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते. ऑगस्ट महिन्यात देशात दुसरी सर्वात जास्त विक्री होणारी ही कार आहे. या कारमध्ये पेट्रोल इंजिन सोबत पाच स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आले आहे. या मारुती सुझुकी बलेनोची किंमत 6.61 लाख रुपये ते 9.81 लाख रुपये एवढी आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या डिस्काउंट ऑफर नुसार ही कार तुम्ही 35000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. एवढेच नाही तर कंपनीकडून या कारवर एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध करण्यात आला आहे. जर तुम्ही ही कार 2 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला स्पेशल फेस्टिवल डिस्काउंट म्हणून 5000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
२) MARUTI SUZUKI CIAZ–
MARUTI SUZUKI CIAZ या कारमध्ये एक पॉईंट पाच लिटर K सिरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 103 BHP पावर आणि 138 NM पिक टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये माइल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली असून या टेक्नॉलॉजी मुळे मायलेज मोठ्या प्रमाणात मिळते. या कालच्या मायलेज बद्दल बोलायचं झालं तर या गाडीचे मायलेज 22 किलोमीटर प्रति लिटर एवढे आहे. या कार मध्ये पाच स्पीड मॅन्युअल आणि चार स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स देण्यात आले आहे. या कारची सुरुवाती किंमत 9.30 लाख ते 12.45 रुपये एवढी आहे. या सेडान कार वर कंपनीकडून 48000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही देखील ही कार कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.
३) MARUTI SUZUKI IGNIS–
मारुती सुझुकी इग्निस या कारमध्ये 1.2 लिटर 4 सिलेंडर K12 पेट्रोल इंजन उपलब्ध आहे. हे इंजन 83 Hp पावर आणि 113 nm पिक टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर या इंजिन सोबत पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअर बॉक्स देण्यात आले आहे. यामध्ये देण्यात आलेल्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 7.0 इंच टच स्क्रीन इम्पॉर्टंट सिस्टीम उपलब्ध आहे. ही सिस्टीम स्मार्ट प्ले स्टुडिओने सुसज्ज आहे. याशिवाय वाय रीकोग्नायझेशन सिस्टीम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअर बॅग , रियर पार्किंग सेंसर, एबीएस यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5.84 ते 8.30 लाख रुपये एवढी आहे. त्यापैकी मॅन्युअल व्हेरिएंटव कंपनीकडून 65000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. आणि ऑटोमॅटिक व्हेरीएंटवर 55,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. मारुती सुझुकी ने दिलेल्या फेस्टिव ऑफरनुसार या कारवर मिळणाऱ्या आकर्षक सूटचा लाभ तुम्ही 31 ऑक्टोंबर पर्यंत घेऊ शकतात. शानदार डिस्काउंट सोबत कार खरेदी करणे तुम्हाला सोयीस्कर ठरणार आहे.