आता Free मध्ये पहा Asia Cup आणि World Cup चे सामने; कुठे आणि कसं ते जाणून घ्या

टाइम्स मराठी । क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आगामी आशिया चषक आणि वर्ल्ड कपचे सर्व सामने तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टार च्या माध्यमातून पाहता येऊ शकणार आहेत. Jio सिनेमाने याआधीच फ्री मध्ये सामने पाहण्याची घोषणा केली होती. आता जिओ सिनेमाला टक्कर देण्यासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार मैदानात उतरले आहे. म्हणजेच आता एशिया कप आणि वर्ल्ड कप टूर्नामेंट डिज्नी प्लस हॉटस्टार प्लॅटफॉर्मवर फ्री मध्ये दाखवण्यात येणार आहे. एशिया कप 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर पर्यंत खेळण्यात येणार आहे. यासोबतच 5 ऑक्टोबर ला वर्ल्ड कप 2023 देखील सुरू होणार आहे.

   

डिज्नी प्लस हॉटस्टार ने केली घोषणा

एकावेळी क्रिकेट मॅच लाईव्ह प्रसारण करण्यासाठी जास्त राइट्स डिज्नी प्लस हॉटस्टार कडे होते. परंतु हे राईट स्ट्रीमिंगच्या माध्यमातून जिओ सिनेमा कडे गेले होते. त्यामुळे डिस्नी प्लस हॉटस्टार च्या युजर ची संख्या प्रचंड प्रमाणात घटली होती. आता डिज्नी प्लस हॉटस्टार ने घोषणा केली आहे की, येणाऱ्या एशिया कप 2023 आणि आयसीसी वर्ल्ड कप 2023 या दोन्ही टूर्नामेंट मोबाईलवर फ्री मध्ये बघता येऊ शकतात. याबाबत डिस्नी प्लस हॉटस्टार ने ट्विटरच्या माध्यमातून 40 सेकंदाचा व्हिडिओ शेअर करत माहिती दिली.

ट्विटरच्या माध्यमातून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओ सोबत या OTT प्लॅटफॉर्म ने कॅप्शन दिले की, लँडिंग क्लियरन्स मिळेल किंवा नाही, पण आशिया कप आणि आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप फ्री मध्ये तर मिळाला. आता बघा जगातील सर्वात मोठया टूर्नामेंटच्या मॅचेस कुठे पण तेही तुमच्या मोबाईलवर. ते देखील फ्री मध्ये फक्त डिस्नी हॉटस्टार वर अशी जाहिरात डिस्नी हॉटस्टार कडून करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

मोठी स्किन किंवा टीव्हीवर पाहण्यासाठी घ्यावे लागणार सबस्क्रिप्शन

जर तुम्ही हे दोन्ही टूर्नामेंट टीव्हीच्या माध्यमातून बघू इच्छित असाल तर तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. याशिवाय तुम्ही पाच मिनिटांची फ्री क्रिकेट मॅच बघू शकतात. डिज्नी प्लस हॉटस्टार ने ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार तुम्ही मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद फ्री मध्ये घेऊ शकता. एशिया कप 2023 आणि आयसीसी वर्ल्ड कप 2023 दोन्ही टूर्नामेंटचे राईट डिग्नी प्लस हॉटस्टार कडे आहेत. या राईट च्या माध्यमातून डिस्नी प्लस हॉटस्टार ओटीपी प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त क्रिकेट फॅन्स आणण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच डिज्नी प्लस हॉटस्टारचे कमी झालेले युजर देखील परत आणण्याचा यामागील प्लान आहे