टाइम्स मराठी । आज-काल स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अन्न वस्त्र निवारा प्रमाणेच आता मोबाईल देखील महत्त्वाचा झाला आहे. या डिजिटल युगामध्ये आजकाल सर्वच गोष्टी ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे फोन सतत सोबत ठेवावा लागतो. आजकाल मोबाईलच्या माध्यमातूनच ऑफिशियल काम, पेमेंट, मनी ट्रान्सफर, यासारखे बरेच काम होतात. ज्या पद्धतीने डिजिटल युग सुरू झाले त्या पद्धतीने सायबर क्राईम देखील प्रचंड प्रमाणात वाढले. हे सायबर क्राईम म्हणजेच ऑनलाइन गुन्हे. दरवर्षी लाखो लोक सायबर क्राईम चे शिकार होतात. अशावेळी सायबर क्राईम किंवा ऑनलाइन फ्रॉडींग पासून वाचण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे.
कोरोना महामारीच्या काळापासून ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा मोठ्या प्रमाणात वाढली. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने UPI, Phonepe, Google Pay पेमेंट करणे डेली रुटीन प्रमाणेच सुरू राहिले. त्याचबरोबर सध्या चहाच्या दुकानापासून ते मॉल पर्यंत सर्वच ठिकाणी ऑनलाइन पेमेंट करणे सुरू आहे. ज्याप्रकारे ऑनलाइन पेमेंट सुविधा उपलब्ध झाली त्याप्रमाणेच ऑनलाइन फ्रॉडींग देखील प्रचंड वाढलं आहे. अशावेळी ऑनलाइन फ्रॉड होण्यापासून वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ते जाणून घ्या.
१) सतर्क राहणे गरजेचे
जर तुम्हाला एखाद्या अनोखी व्यक्तीचा एसएमएस, ईमेल किंवा कॉल येत असेल तर तुम्हाला सतर्क राहणे गरजेचे आहे. कारण आज-काल अनोळखी नंबर वरून कॉल करून बँकिंग डिटेल्स आणि पर्सनल डिटेल्स मागवले जातात. यासोबतच मोबाईलवर येणारा ओटीपी देखील कधीच कोणाला शेअर करू नये.
२) स्ट्रॉंग पासवर्ड आणि युजरनेम टाका
सायबर फ्रॉड होण्यापासून वाचण्यासाठी ऑनलाइन पेमेंट एप्लीकेशनला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन असणे गरजेचे आहे. यासोबतच तुमचे ऑनलाईन एप्लीकेशन कोणी हॅक करू नये यासाठी मजबूत पासवर्ड आणि युजरनेम टाकणं गरजेचे आहे. हे पासवर्ड आणि युजर नेम तुमचं नाव किंवा मोबाईल नंबर असल्यास फ्रॉड करणारे व्यक्तीकडून सोप्या पद्धतीने एप्लीकेशन हॅक केले जाते. त्यामुळे मोबाईल नंबर किंवा तुमचं नाव पासवर्ड म्हणून कधीच ठेवू नये.
३) सिक्युअर इंटरनेटचा वापर करा
सायबर फ्रॉड पासून वाचण्यासाठी सिक्युअर इंटरनेट कनेक्शन वापरणे गरजेचे आहे. जर तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर अँटिव्हायरस आणि सिक्युरिटी बॉल चा वापर करणे गरजेचे आहे. यासोबतच वायरलेस नेटवर्क चा वापर करणे देखील गरजेचे आहे.
४) सॉफ्टवेअर अपडेट करणे गरजेचे
तुम्ही वापरत असलेल्या स्मार्टफोनमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ब्राउझर अँटीव्हायरस आणि सिक्युरिटी सॉफ्टवेअर डेली अपडेट करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यामुळे तुमचा मोबाईल सुरक्षित राहील. आणि तुम्ही सायबर क्राईम पासून वाचू शकाल.
५) मोबाईलवर आलेला OTP सांगू नये
सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढत असून एखादा OTP आपला मोबाईल वर आल्यास आपल्याला लगेच एखाद्या व्यक्तीचा कॉल येत असेल आणि OTP सांगा म्हणून रिक्वेस्ट करत असेल तर चुकूनही OTP सांगू नका. तुम्ही OTP सांगितल्यास तुमच्या बँक अकाउंट मधील सर्व पैसे काढून बँक अकाउंट रिकाम होऊ शकते.