तुम्हीही Toilet मध्ये Mobile घेऊन बसता? सावध व्हा, अन्यथा नपुंसक व्हाल

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक कामासाठी मोबाईल (Mobile) हा गरजेचा झाला आहे.अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाच्या हातात सतत मोबाईल असतो. काहीजणांना तर मोबाईल हातात घेतल्याशिवाय चैन पडत नाही. मोबाईलचे हे वेड इतक्या टोकाला गेलं आहे कि आजकाल अगदी टॉयलेटला ( Toilet) जातानाही मोबाईल घेऊनच काहीजण जात आहेत. परंतु मोबाईलचा हा अतिवापर चुकीचा असून टॉयलेट मध्ये फोन घेऊन जाणे हे किटाणूला आमंत्रण देण्यासारखे आहे. आपली ही घाण सवय आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. एवढेच नाही तर तुमच्या डीएनए वर देखील याचा परिणाम दिसू शकतो. याचा सगळ्यात जास्त वाईट परिणाम म्हणजे तुम्ही नपुंसक होऊ शकतात.

   

टॉयलेटमध्ये बरेच बॅक्टेरिया आणि किटाणू असतात. हे किटाणू आपल्या स्मार्टफोनवर लगेच बसतात. आणि टॉयलेट मधून आल्यानंतर स्मार्टफोन क्लीन न केल्यास स्मार्टफोनच्या स्क्रीनवर चिपकलेले बॅक्टेरिया तुम्ही ज्या ठिकाणी जाल, किचन, हॉल, बेडरूम त्या ठिकाणी पसरतात. यामुळे तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. एवढेच नाहीतर युरीन इन्फेक्शन होण्याची देखील चान्सेस मोठ्या प्रमाणात असतात.

जर तुम्ही टॉयलेट मध्ये गेल्यावर इंस्टाग्राम चे रिल्स, यूट्यूब व्हिडिओज, किंवा डेली अपडेट सतत बघत असाल तर तुमचं नॉलेज वाढेल परंतु तुमच्या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम पडेल. जर तुम्ही टॉयलेट मधून आल्यानंतर हात क्लीन करत असाल आणि परत टॉयलेट मध्ये नेलेला स्मार्टफोन टच करत असाल तर तुमचा हात धुण्याचा देखील काहीच फायदा नाही. तुमच्या स्मार्टफोनवर बसलेले बॅक्टेरिया तुम्हाला आजारी पाडू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, जर तुम्ही तुमचा मोबाईल जास्त वेळ पर्यंत जीन्सच्या खिशात ठेवत असाल तर तुमच्या बॉडीला दहापट रेडिएशनचा सामना करावा लागतो. यामुळे रेडिएशन कॅन्सर होण्याचे देखील चान्सेस असतात. आणि हे रेडिएशन तुमच्या डीएनए स्ट्रक्चरला बदलू शकतात. यामुळे नपुंसक होण्याचा प्रचंड धोका आहे. म्हणूनच जास्तीत जास्त स्मार्टफोन स्वतःपासून लांब ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.