किचनमधील सिंक सतत जाम होतंय? ‘हे’ घरगुती उपाय करा आणि टेन्शन सोडा

टाइम्स मराठी । आपण घराची साफसफाई करतो. पण किचन मधला महत्त्वाचा भाग साफ करायचा विसरतो. तो महत्त्वाचा भाग म्हणजे सिंक. त्यामुळे किचन सिंक ब्लॉक होणं या समस्येला आपल्याला सतत तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर हे सिंक ब्लॉक झालं की पुन्हा दुरुस्त करायला बराच वेळ जातो. एवढंच नाही तर समस्येला सोडवण्यासाठी प्लंबरला देखील बोलवावे लागते. बऱ्याचदा प्लंबरला बोलावणे देखील शक्य नसते. त्यावेळी आपण काही घरगुती ट्रिक्स वापरून सिंक सुरळीत चालू करू शकतो. त्यासाठी काही घरगुती पदार्थांचाचा आपल्याला वापर करावा लागेल. तर चला बघूया या काही ट्रिक्स.

   

१) कॉफी आणि गरम पाणी

किचन रूम मधील सिंग साफ करण्यासाठी कॉफी वापरणं हा सर्वात चांगला पर्याय आहे. त्यासाठी आपल्याला कॉफी, उकळतं पाणी आणि साबण गरजेचा आहे. सर्वात पहिले कॉपी आणि लिक्विड साबण ब्लॉक झालेल्या सिंक मध्ये टाका. त्यानंतर उकळते पाणी टाका. या पद्धतीने सिंक मध्ये अडकलेली घाण पूर्णपणे निघून जाईल. आणि सिंग मधून येणारा वास देखील निघेल.

२) व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

आपल्या किचनमध्ये विनेगर आणि बेकिंग सोडा उपलब्ध असतोच. किचन सिंक मध्ये अडकलेला कचरा बाहेर काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर महत्त्वाचा आहे. कारण यामुळे सिंक मध्ये जमलेला कचरा पिघळतो. या पद्धतीसाठी आधी किचन सिंक मध्ये बेकिंग सोडा टाका, त्यानंतर विनेगर टाका. यामुळे संपूर्ण घाण निघून जाईल. त्याचबरोबर व्हिनेगर च्या ऐवजी तुम्ही लिंबूचा सुद्धा उपयोग करू शकतात.

३) बेकिंग सोडा आणि मीठ

किचन सिंक अनब्लॉक करण्यासाठी ही देखील एक पद्धत आहे. या पद्धतीला थोडासा वेळ लागतो पण किचन सिंक सुरळीत सुरु होतो. यासाठी रात्रीच्या वेळी एक बेकिंग सोडा मध्ये दीड कप मीठ घाला. ते सिंकच्या ड्रेन मध्ये टाका. सकाळी उठल्यानंतर त्यामध्ये उकळलेले गरम पाणी टाका. त्यानंतर सर्व घाण निघून जाईल.

दरम्यान, किचन सिंक ब्लॉक होऊ नये यासाठी तुम्हाला साफसफाई करावी लागेल. आठवड्यातून किंवा १० दिवसातून २ वेळेस तुम्ही किचन सिंक साफ केले तर सिंक ब्लॉक होणार नाही. त्याचबरोबर खरगटे भांडे सिंक मध्ये ठेवणे टाळा. या पद्धतीने जर सिंक ची साफसफाई केली तर सिंक ब्लॉक होण्यापासून वाचू शकते.