Facebook वर कधीही करू नका ‘हे’ काम; अन्यथा खावी लागेल जेलची हवा

टाइम्स मराठी | सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर आज काल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, युट्युब, फेसबुक यासारखे बरेच ॲप्स यात येतात. व्हाट्सअप आल्यापासून फेसबुक फार कमी प्रमाणात युजर्स वापरू लागले आहेत. तरीही फेसबुकचे आणि फेसबुक मेसेंजर चे लाखो ऍक्टिव्ह युजर्स आहेत. फेसबुक या ॲपवर मोठ्या प्रमाणात युजर्स ऍक्टिव्ह असतात. हे युजर्स फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट, फोटो अपलोड, मेसेज साठी मेसेंजर चा वापर करतात.

   

यासोबतच फेसबुक आणि instagram च्या माध्यमातून बरेच जण कंटेंट तयार करून पोस्ट किंवा व्हिडिओ अपलोड करतात. आणि यातून पैसे देखील कमवतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? काही कंटेन्ट मुळे तुम्हाला जेल जावे लागू शकते. फेसबुक वर अशा काही टॉपिक्स वर कन्टेन्ट बनवून पोस्ट केल्यास किंवा व्हिडिओ बनवल्यास तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

1) क्राईम व्हिडिओज

जर तुम्ही फेसबुक प्लॅटफॉर्मवर क्राइम कंटेंट बनवून किंवा क्राइम कंटेन चा व्हिडिओ शेअर करत असाल आणि त्या व्हिडिओमध्ये काही असे सीन पाहण्यायोग्य नसतील तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीने तुमचा कंटेंट न आवडल्यास आणि अयोग्य सिन असल्याचा गुन्हा आणि तुमच्या विरोधात रिपोर्ट दाखल केल्यास तुम्हाला जेलमध्ये जावे लागू शकते. त्यामुळे कधीही क्राईम व्हिडिओज कन्टेन्ट देताना किंवा पोस्ट शेअर करताना अश्लील आणि अयोग्य क्लिप्स हटवा. नाहीतर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात.

2) वोयलेन्स व्हिडिओ

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आपत्ती जनक कंटेंट पोस्ट केल्या जातात. फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप या आजचा ज्या प्रकारे वापर वाढला आहे त्या प्रकारे दुरुपयोग देखील करण्यात येत आहे. कोणतीही घटना घडल्यानंतर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून वादग्रस्त कंटेंट पोस्ट होत असतात. आणि अशा प्रकारचे कंटेंट वाद पेटवू देखील शकतात. त्यामुळे जर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून वायलेंस कन्टेन्ट किंवा व्हिडिओ पोस्ट करत असाल तर तुम्हाला जेलमध्ये जावे लागू शकते.

3) अडल्ट कन्टेन्ट

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच इंस्टाग्राम फेसबुक व्हाट्सअप यावर आजकाल 18 वर्षाखालील मुले देखील आहेत. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अडल्ट व्हिडिओज पोस्ट करण्यात आल्यास त्यांच्यावर वाईट परिणाम पडतो. अठरा वर्षाखालील मुलेच नाही तर अडल्ट मुळे बऱ्याच व्यक्तींच्या मनावर वेगळा परिणाम पडतो आणि यामुळे गुन्हेगारी वाढते. या सोबतच अडल्ट कन्टेन्ट पोस्ट करणे हा एक गुन्हा आहे. जर तुम्ही देखील अडल्ट कंटेंट पोस्ट करत असाल तर तुम्हाला जेलमध्ये जावे लागू शकते.

4) व्हिडिओ पायरेसी

व्हिडिओ पायरेसी चा अर्थ हिंसात्मक चोरी असा देखील होतो. थेटर मध्ये लॉन्च करण्यात आलेली एखादी मूवी रेकॉर्ड करून फ्री मध्ये डाऊनलोड करण्यासाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देणे म्हणजे व्हिडिओ पायरेसी. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कॉपीराईट. जर तुम्ही सोशल मीडियावर कॉपीराईट गेलेला कंटेंट टाकत असाल तर तुम्हाला जेलमध्ये जावे लागू शकते. कॉपीराईड कन्टेन्ट सोशल मीडिया सोबतच फिल्म इंडस्ट्री मध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. Youtube वर कन्टेन्ट पोस्ट करणाऱ्यांना याबाबत महत्त्वपूर्ण माहिती असेल. कारण एखादा व्हिडिओ किंवा कंटेंट पोस्ट केल्यानंतर तो कंटेंट कोणाचातरी चोरल्याचा आरोप लावण्यात येतो. म्हणजेच त्या कंटेंट वर कॉपी राईट येतं. या संदर्भात जर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून कॉपीराईट कन्टेन्ट टाकत असाल तर तुम्हाला जेलमध्ये जावे लागू शकते.

5) अब्युस व्हिडीओ

फेसबुकच्या माध्यमातून जर तुम्ही शिवीगाळ केलेला कंटेंट किंवा अब्युसिव कन्टेन्ट पोस्ट करत असाल तर हे हानिकारक आहे. तुमच्या पोस्टवर एखाद्या व्यक्तीने आक्षेप घेऊन तुमच्या विरोधात तक्रार केली तर तुम्ही जेलमध्ये जाऊ शकतात.