Pizza ची डिलिव्हरी थेट हवेतून!! जेटपॅकचा वापर; Domino’s ची गजब टेक्नॉलॉजी

टाईम्स मराठी । सोशल मीडिया वर सतत काही न काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच काही व्हिडीओ हे आश्चर्यचकित करणारे असतात. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय जेट सूट वापरून हवेत उडून पिझ्झा डिलिव्हरी करत आहे. हा व्हिडिओ बघितल्यावर असं वाटतं की टेक्नॉलॉजी किती पुढे चाललेली आहे. हा व्हायरल व्हिडिओ युनायटेड किंगडम येथील असून ग्लास्टबरी महोत्सवांमध्ये हा डिलिव्हरी बॉय उडून पिझ्झा डिलिव्हरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ग्राहकांना त्यांचा पिझ्झा वेळेमध्ये मिळावा यासाठी पिझ्झा ड्रायव्हरने केलेला हा प्रवास त्यांनी यामध्ये दाखवला.

   

“या फेस्टिवल मध्ये लवकरात लवकर पिझ्झा डिलिव्हर करणे अशक्य आहे हे समजल्यावर आम्ही ही टेस्ट घेतली. त्यासाठी आम्ही हेडलाईनर कडून प्रेरणा घेतली.” असं डोमिनोज चे सॅम विल्सन म्हणाले. त्यांनी यावेळी हे देखील स्पष्ट केले की प्रत्येक वर्षी आम्ही या फेस्टिवलच्या ठिकाणी पिझ्झा डिलिव्हरी करायला जातो, तर बरेचदा पिझ्झा चोरण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे भविष्यात फ्लाईंग जेट चा वापर करून पिझ्झा डिलिव्हरी केल्या जाईल का याची चाचणी आम्हाला घ्यायची होती. असं त्यांनी सांगितलं.

या ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज ने डिझाईन केलेल्या कस्टम-मेड सूट ची किंमत अद्याप उघड झालेली नसली तरीही ही लाखो हजारो पाऊंड असू शकते. जेट सूट वापरून पिझ्झा गरमागरम डिलिव्हर करणे हा आमच्या तंत्रज्ञानाचा हेतू असून कॉम्पिटिशन मध्ये असलेल्यांना लवकरच लवकर पिझा डिलिव्हरी करणे गरजेचे होते. असं त्यांचं म्हणणं आहे.

सोमवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये डोमिनोज शॉप जवळ डिलिव्हरी बॉय जेट सूट घालून पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी जात आहे. त्यानंतर तो अचानकच फ्लाईंग करतो आणि लोकेशन वर पिझ्झा डिलिव्हर करतो. पुन्हा तो डोमिनोज शॉप जवळ येऊन पायाच्या साहाय्याने उतरून दुसऱ्या ठिकाणी डिलिव्हरी करण्यासाठी पिझ्झा घेऊन जाताना दिसतो. या व्हिडिओला प्रचंड लाईक आलेले असून टेक्नॉलॉजी किती पुढे जात आहे हे यातून दिसते.