Mobile Radiation कडे करू नका दुर्लक्ष; आरोग्यावर होईल मोठा परिणाम

टाइम्स मराठी । अन्न वस्त्र निवाराप्रमाणे स्मार्टफोन देखील आता गरजेचे साधन बनले आहे. आजकाल स्मार्टफोनवरच बरेच कामे केली जातात. त्यामुळे स्मार्टफोन शिवाय घराच्या बाहेर पडणे सहज शक्य होत नाही. स्मार्टफोन पूर्वी फक्त कॉलिंग आणि गेम यापुरता मर्यादित होता परंतु आता ऑफिशियल कामे देखील स्मार्टफोनच्या माध्यमातून केली जातात. याशिवाय डिजिटल बँकिंग चे जग असल्यामुळे पेमेंट करण्यासाठी देखील मोबाईलचा वापर सहसा केला जातो. यामुळे 24 तास स्मार्टफोन आपल्या सोबतच ठेवावा लागतो. परंतु या स्मार्टफोनमुळे आरोग्यावर आणि मानवाच्या शरीरावर देखील वाईट परिणाम पडतात.

   

मोबाईल मधून निघणारे रेडिएशन आपल्या आरोग्याला हानी पोहोचवत असतात. हे रेडिएशन जाणून घेण्यासाठी आपल्याला SAR मूल्य जाणून घ्यावे लागेल. या सार मूल्याच्या माध्यमातून आपल्याला रेडिएशन समजते. आणि यामुळे आपले आरोग्याला किती धोका आहे हे देखील आपल्याला समजू शकतं. यापूर्वी आपण जाणून घेऊया SAR म्हणजे नेमकं काय.

SAR म्हणजे काय?

SAR याचे संपूर्ण नाव स्पेसिफिक ऑब्झर्वेशन रेट असे आहे. म्हणजेच SAR च्या माध्यमातून मोबाईल फोन वायरलेस उपकरणे आणि टॅबलेट या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन चा परिणाम मोजला जातो. यासोबतच प्रत्येक मोबाईल साठी वेगवेगळी सार व्हॅल्यू दिलेली असते. ही सार व्हॅल्यू नॉर्मल असेल तर आरोग्यावर जास्त परिणाम पडू शकत नाही. परंतु सर व्हॅल्यू जास्त असेल तर आरोग्यासाठी प्रचंड धोका उद्भवू शकतो. त्यानुसार SAR लिमिट ही 1.6 w/kg एवढी आहे. जर तुमच्या मोबाईलची सार लिमिट 1.6 w/kg यापेक्षा जास्त असेल तर तुमच्या आरोग्यावर परिणाम पडू शकतो.

तुमच्या मोबाईल मध्ये SAR व्हॅल्यू किती आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला मोबाईल कीपॅड वर एक नंबर डायल करावा लागेल. त्यानुसार तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील रेडिएशन समजेल.

1) तुमच्या मोबाईलचा कीपॅड वर USSD कोड *#07# हा नंबर डायल करा.
2) त्यानंतर ऑटोमॅटिकली डिटेक्ट केली जाईल आणि तुम्हाला SAR व्हॅल्यू सोबतच बाकी महत्त्वाची माहिती देखील मिळेल. बऱ्याच प्रीमियम मोबाईल मध्ये ही व्हॅल्यू समजत नाही.

जर तुमच्या मोबाईल वर हा USSD कोड *#07# डायल केल्यानंतर SAR व्हॅल्यू समजत नसेल तर त्यासाठी दुसरा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही माहिती मिळवू शकतात