टाइम्स मराठी | बऱ्याचदा आपण फळे आणि भाज्या खराब होऊ नये यासाठी फ्रिज चा वापर करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? फ्रिज वापरण्याचा ज्याप्रमाणे फायदा आहे त्याप्रमाणे तोटा देखील आहे. काही भाज्यासाठी आणि फळांसाठी फ्रीज वापरणे हे गरजेचे असले तरीही काही भाज्या आणि फळ असे आहेत ते फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे खराब होऊ शकतात. आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर देखील होऊ शकतो. तर आज जाणून घेऊया कोणते फळ आणि भाज्या फ्रिज मध्ये ठेवणे अयोग्य आहे.
1) टॉमेटो
बरेच जण टोमॅटो खराब होतील या भीतीने फ्रिज मध्ये ठेवतात. परंतु हे अत्यंत चुकीचे असून फ्रिज मध्ये टोमॅटो ठेवल्यामुळे लवकर खराब होण्याची शक्यता असते. यामुळे टोमॅटोची टेस्ट बदलते. रेफ्रिजरेटर च तापमान हे थंड असल्यामुळे टोमॅटो फ्रेश राहत नाही. यामुळे कधीही टोमॅटो रेफ्रिजरेटर मध्ये ठेवण्यापेक्षा बाहेर ठेवणे अगदी योग्य आहे. सध्या तर टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या असताना टोमॅटो खराब करणं सर्वात मोठे नुकसानकारक ठरु शकते.
2) लसूण
लसुन कधीच फ्रिज मध्ये ठेवला जात नाही. कारण फ्रिजमध्ये लसूण ठेवल्यामुळे हे रबरा सारखं होऊ शकतं. त्याचबरोबर लसणाला अंकुर देखील येऊ शकतात. त्यामुळे कधीही लसूण हा फ्रिज मध्ये ठेऊ नये.
3) केळी
बऱ्याचदा बाजारातून फळे आल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवतो जातात. या फळांमध्ये केळी हे फळ देखील आपण फ्रिज मध्ये ठेवतो. परंतु हे अत्यंत चुकीचं असून यामुळे सर्दी होण्याचे आणि तुमचे आरोग्य बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याचबरोबर केळी फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे केळीचे साल पूर्णपणे काळे किंवा ब्राऊन कलर चे होते. त्यामुळे जर तुम्हाला फ्रेश केळी हवी असेल तर केळी फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.
4) कांदा
कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यामध्ये शर्करा तयार होतात. आणि कांदा खाण्यायोग्य राहत नाही. त्याचबरोबर फ्रीजमध्ये कांदा खराब होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे कांदा कधीही फ्रिजमध्ये न ठेवता किचनच्या खाली मोकळ्या जागी तुम्ही ठेवू शकतात.
5) मध
मध हे खाण्यासाठी प्रत्येकाला आवडत असतं. त्याचबरोबर मध खाणे हेल्दी देखील असल्याचं सांगण्यात येतं. पण बरेच जण फ्रिजमध्ये मधाची बॉटल ठेवून देतात. हे अत्यंत चुकीचं असून यामुळे मधाची रेस्ट पूर्णपणे बदलते. त्यामुळे कधीही मध हे फ्रिजच्या बाहेर ठेवा.
6) बटाटा
बटाटा हा सुद्धा रोजच्या आहारातील पदार्थ फ्रिज मध्ये ठेवल्यामुळे त्याची चव बदलते. यामुळे बटाट्या मध्ये असलेल्या स्टार्च चे साखरेमध्ये रूपांतर होते. त्यामुळे कधीही बटाटे फ्रिज मध्ये ठेवू नये.
7) ब्रेड
ब्रेड बाजारातून विकत आणल्यानंतर बरेच जण फ्रिज मध्ये ठेवतात. किंवा ब्रेडचे उरलेले अर्धे पॉकेट देखील दोन-तीन दिवसांसाठी फ्रिज मध्ये ठेवले जाते. पण हे हानिकारक असून याचा परिणाम आपल्या आरोग्यावर पडू शकतो. ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे सुकतात आणि यामुळे ते शिळे देखील होऊन जातात. त्यामुळे कधीही फ्रिजमध्ये ब्रेड ठेवण्यापेक्षा ते रूमच्या टेंपरेचर प्रमाणे सील बंद ठेवल्यास चांगले राहतात.