पेट्रोल भरताना बाळगा सावधगिरी!!कधीच करू नका ‘या’ 5 चुका

टाइम्स मराठी | बऱ्याचदा आपण पेट्रोल भरण्यासाठी जवळच्या किंवा गर्दी कमी असलेल्या पेट्रोल पंपावर जातो. परंतु पेट्रोल भरत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. गर्दी नसलेल्या ठिकाणी तुम्ही पेट्रोल भरत असाल तर त्या ठिकाणी असलेल्या पेट्रोलच्या किमती विचारून घेणे अत्यंत गरजेचे आहे. एवढेच नाही तर बऱ्याचदा आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे नुकसान आपल्यालाच भोगावे लागते. आणि या चुकांमुळे पेट्रोल कमी मिळणे, पेट्रोलची टाकी रिकामी राहणे हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तुम्ही कितीही घाईघडबडिट असला तरी पेट्रोल भरत असताना काही गोष्टींवर लक्ष ठेवलेच पाहिजे.

   

1) पेट्रोलच्या किमती तपासा

तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी जाताना पेट्रोल पंपावर काय किंमत आहे हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. कारण बऱ्याचदा पेट्रोलची ओरिजनल किंमत वेगळी असते आणि बरेच पेट्रोल पंपावर जास्त किमतीमध्ये पेट्रोल विकले जाते जाते. कधी कधी खासगी पेट्रोल पंपावर जास्त किमतीमध्ये पेट्रोल विकलं जाते.

2) शून्य चेक करा

पेट्रोल भरत असताना बरेच जण मोबाईल बघत बसतात. पण पेट्रोलचे मीटर चेक करत नाही. बऱ्याचदा पेट्रोल भरताना फ्रॉड केला जाते. त्यामुळे पेट्रोलचा शून्य पाहणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून काही फ्रॉड असल्यास आपल्याला समजू शकेल.

3) इंजिन बंद करा

पेट्रोल भरत असताना तुमच्या गाडीचे इंजिन बंद करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमचे इंधन वाचेल. त्याचबरोबर इंजिन चालू असताना पेट्रोल भरल्यामुळे आग लागण्याची शक्यता जास्त असते. पेट्रोल पंपावर ही घटना आपण बऱ्याच वेळेस ऐकली किंवा बघितली असेल. त्यामुळे नुकसान होण्यापासून वाचण्यासाठी इंजिन बंद करणे गरजेचे आहे.

4) ऑटोकट ऑफ नंतर पुन्हा इंधन भरण्यापासून वाचा

जेव्हा तुम्ही कार मध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरतात अशावेळी मशीन सेट केलेले असते. त्यामुळे कारला तेवढेच इंधन मिळतं जेवढं मशीन मध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर मशीन आपोआप बंद होऊन जाते. त्यामुळे ऑटो कट ऑफ नंतर कधीच इंधन भरू नका.

5) मोबाईल फोन लांब ठेवा

तुम्ही बऱ्याचदा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना मोबाईल फोन चालू असल्यामुळे आग लागल्याची घटना वाचली असेल. त्यामुळे पेट्रोल भरत असताना कधीच मोबाईल फोन कॉल सुरू ठेवू नका. त्याचबरोबर पेट्रोल पंपावर सिगरेट पिणे हे देखील अत्यंत धोकादायक आहे.