Doogee Smini : बाजारात आलाय मजबूत मोबाईल; पाण्यात पडला तरी नो टेन्शन

Doogee Smini : मजबूत आणि दणकट मोबाईल बनवणाऱ्या Doogee कंपनीने बाजारात एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा हा मोबाईल इतका मजबूत आहे कि कसाही वापरला तरी त्याला काहीही होणार नाही. Doogee Smini असे या मोबाईलचे नाव असून हा मोबाईल पाण्यात पडला तरीही खराब होत नाही. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स जाणून घेऊयात.

   

स्पेसिफिकेशन

Doogee Smini या स्मार्टफोनमध्ये 4.5 इंच चा IPS डिस्प्ले देण्यात आले आहे. हे पॅनल 1,170 × 480 पिक्सल रिझोल्युशन ऑफर करतो. या फोनमध्ये  मीडियाटेक हेलियो G99 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा 8 कोर  प्रोसेसर 2.0 GHz एवढ्या स्पीड मध्ये रन करतो. यामध्ये देण्यात आलेल्या बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर, 3000mAh बॅटरी यामध्ये वापरण्यात आली असून ही बॅटरी 18 W फास्ट चार्जरला सपोर्ट करते. बॅटरी बॅकअप बद्दल सांगायचं झाल्यास, नियमित वापर केला तरी ही बॅटरी एक दिवसापेक्षा जास्त चालू शकते.

कॅमेरा– Doogee Smini

Doogee Smini या मोबाईलमध्ये 50 MP प्रायमरी कॅमेरा आणि 2 MP सेकंडरी कॅमेरा, 8 MP फ्रंट कॅमेरा  देण्यात आला आहे. त्याचबरोबर स्टोरेज साठी 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज यामध्ये आपल्याला मिळेल. हा फोन छोटा आणि हलका असला तरी देखील टिकाऊ आहे. या फोनला IP68 आणि IP69K सर्टिफिकेशन देण्यात आले आहे. म्हणजेच हा मोबाईल फक्त धूळ प्रतिरोधक नाही तर पाणी प्रतिरोधक देखील आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन पाण्यामध्ये पडल्यावर देखील खराब होत नाही. आणि कोणत्याही परिस्थितीत कसाही आपण वापरू शकतो.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Doogee SminiI या मोबाईल मध्ये फिंगरप्रिंट सेंसर, USB C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आले आहे. तुम्ही देखील हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, AliExpress वरून खरेदी करू शकता. या मोबाईलची किंमत अजून उघड करण्यात आली नसून हा फोन महाग असण्याची शक्यता आहे.