Doogee V30 Pro : कधीही न फुटणारा Mobile लाँच; जमिनीवर पडला तरी नो टेन्शन!!

टाइम्स मराठी । भारतात मोबाईलच वेड खूपच आहे. त्यामुळे अनेक कंपन्या सातत्याने नवनवीन मोबाईल बाजारात आणत असतात. आताही बाजारात असा एक मोबाईल आला आहे जो तुम्ही कितीही उंचावरून जमिनीवर फेकला तरी तुटणार नाही. DOOGEE कंपनीने बनवलेल्या या स्मार्टफोनचे नाव Doogee V30 Pro असे आहे. आज आपण या मजबूत आणि दणकट मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.

   

स्पेसिफिकेशन

Doogee V30 Pro या स्मार्टफोनमध्ये 6.58 इंच चा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले HFD आणि IPS पॅनल मध्ये उपलब्ध आहे. हा डिस्प्ले 120 HZ रिफ्रेश रेट सह येतो. DOOGEE ही कंपनी टिकाऊ प्रॉडक्ट तयार करते. कंपनीने लॉन्च केलेला हा लेटेस्ट फोन 512 GB इंटरनल स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्शन 7050 चिपसेट उपलब्ध देण्यात आला असून हा मोबाईल Android 13 वर काम करतो.

कॅमेरा– Doogee V30 Pro

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Doogee V30 Pro या फोनमध्ये 200 MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच हाय क्वालिटी मध्ये समोरील बाजूला 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये 10,800  mAh बॅटरी दिली आहे. तुम्ही हा मोबाईल खाकी सिल्वर आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता.

किंमत किती?

Doogee V30 Pro मध्ये ड्युअल 5G सिम सपोर्ट उपलब्ध करण्यात आला आहे. त्यानुसार तुम्ही या मोबाईल मध्ये २ फाईव्ह जी सिम वापरू शकतात. यासोबतच wifi आणि साईड माउंटेन फिंगरप्रिंट रीडर देखील यामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या स्मार्टफोनची किंमत 999 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 83,146 मध्ये उपलब्ध केला आहे. तुम्ही देखील हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर AliExpress वर प्री ऑर्डर करू शकता.