लायसन्स शिवाय चालवा ‘या’ Electric Scooter; कोणी आडवणार पण नाही

टाइम्स मराठी । जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी स्कूटर किंवा टू व्हीलर घेऊन जातो, तेव्हा आपल्याकडे ट्राफिक नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे असते. हे ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याकडे नसेल तर आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. यासोबतच पोलिसांनी पकडल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे चलन देखील बऱ्याच ठिकाणी काढले जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का अशा काही स्कूटर्स आहेत ज्यांना तुम्ही लायसन शिवाय कुठेही आरामात चालवू शकता. जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल.

   
miso banner1

१) Gemopai Miso

कंपनीने भारतात नुकतीच ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली असून या स्कूटरच नाव Gemopai Misoआहे. या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही बॅटरी एका फुल्ल चार्ज होण्यासाठी २ तासांचा कालावधी लागतो. परतू एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 75 किलोमीटर पर्यंत चालते. Gemopai Miso या इलेक्ट्रिक स्कूटरचे टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रतितास एवढ आहे. ही एक मिनी इलेक्ट्रिक स्कूटर असून तुम्हालाही वापरण्यासाठी आरटीओ मध्ये परमिट घेण्याची गरज नाही.

Hero electric flash

२) Hero electric flash

या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 250 वॅटची मोटर लावण्यात आली असून ही मोटर 48 वोल्ट 28Ah लिथियम आयन बॅटरीच्या माध्यमातून समर्थित आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 65 किलोमीटर पर्यंत चालू शकते. यासोबतच 25 किलोमीटर प्रति तास स्पीड ने ही इलेक्ट्रिक स्कूटर चालते. या इलेक्ट्रिक स्कूटर ची बॅटरी चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास लागतात.

Okinawa lite

३) Okinawa lite

या इलेक्ट्रिक स्कूटर कमी किमतीमध्ये उपलब्ध असून यात 1.25 kwh क्षमता असलेली लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या बॅटरी पॅक सोबतच BLDC टेक्नॉलॉजी वर आधारित असलेली 250 W ची इलेक्ट्रिक मोटर देखील जोडण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल्ल चार्ज व्हायला ४ ते ५ तास लागतात परंतु एकदा चार्ज केल्यानंतर Okinawa lite इलेक्ट्रिक स्कुटर 60 किलोमीटर पर्यंत रेंज देते. या इलेक्ट्रिक स्कूटरचर टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास इतकं आहे. त्याचबरोबर स्कूटर मध्ये all digital इन्स्ट्रुमेंट cluster, LED Tail Lamp आणि LED indicator देण्यात आले आहे.