आता ड्रायव्हर शिवाय धावणार बसेस; ‘या’ शहरात सुरू करण्यात आली सुविधा

टाइम्स मराठी | आजकाल जगात सायन्स आणि टेक्नॉलॉजी एवढ्या पुढे गेलेली आहे की आपण फक्त विचार केलेली एखादी गोष्ट आपला समोर तयार होऊन उभी असते. ऑटोमोबाईल क्षेत्राचा विचार केला तर, पूर्वी सायकलवर लोक प्रवास करत होते. त्यानंतर पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध झाल्या. आता काही वर्षांपासून इलेक्ट्रिक  वाहन रस्त्यावर धावताना दिसत आहे. आता काही वर्षा नंतर फ्लाईंग कार देखील लवकरच लॉन्च होणार आहेत. आणि यातच आता बऱ्याच कंपन्या ड्रायव्हर लेस ऑटोमॅटिक कार तयार करत असताना अमेरिकेतील सॅन फ्रान्सीको शहरांमध्ये ड्रायव्हर लेस (Driverless Bus) बस सुविधा सुरू करण्यात आली आहे.

   

कॅलिफोर्निया मध्ये रोबोटॅक्सीला परवानगी मिळाल्यानंतर एका आठवड्यामध्येच ही बस रस्त्यावर धावताना दिसली.  सॅन फ्रान्सिको या ठिकाणी असलेल्या ट्रेझर आयलँड वर ही बस सेवा सुरू करण्यात आली असून ही बस इलेक्ट्रिक आहे. दीप नावाच्या कंपनीने या बसेस तयार केल्या आहेत.  या ड्रायव्हर लेस बस मध्ये टीयरिंग व्हील आणि ड्रायव्हर सीट देखील देण्यात आलेले नाही.

या बस मध्ये एका वेळी दहा जण प्रवास करू शकतात. सध्या अशा प्रकारच्या दोन बस सुरू करण्यात आल्या आहे.  त्यानुसार एका बसची फेरी सुरू असताना दुसरी बस चार्जिंग करण्यात येते. ही बस सेवा एका ठराविक मार्गावर लावणार आहे. या बसचे टायमिंग सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठेवण्यात आलेला असून ही शटल सुविधा आहे. या मार्गावर बस प्रत्येक वीस मिनिटांनी एक अशी फेरी मारेल.

सॅन फ्रान्सिस्को या शहरांमध्ये बऱ्याच ड्रायव्हर लेस वाहनांची चाचणी सुरू आहे. सध्या सुविधा देत असलेल्या ड्रायव्हर लेस बसची चाचणी यशस्वी झाल्यानंतर त्याचा मोठ्या स्तरावर वापर सुरू करण्यात येऊ शकतो. अमेरिकेतील बीप कंपनी ही बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिक ड्रायव्हर लेस बसची चाचणी घेणार आहे. यासोबतच ऑटोमॅटिक वाहनांचा अपघात होण्याची शक्यता प्रचंड असते यासाठी उपाय म्हणून गरज असेल तेव्हा ऑपरेटर रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने देखील ही बस ऑपरेट करता येऊ शकते. त्यामुळे अपघाताची शक्यता टळू शकते.

या ड्रायव्हर लेस बस मध्ये प्रवास केल्यानंतर प्रवासांनी हा विस्मरणीय अनुभव असल्याचे सांगितलं. त्याचबरोबर या बस मध्ये ड्रायव्हर नसल्याचे जाणवलं देखील नाही. या बसच्या माध्यमातून सुरक्षित प्रवास करता आला असं प्रवाशांनी म्हंटल.