Ducati ने लाँच केली जबरदस्त सुपर Bike; किंमत अन् फीचर्स पहा

टाईम्स मराठी | इटालियन कंपनी Ducati ने भारतीय बाजारपेठेमध्ये Panigale V4 R ही सुपर बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईकची किंमत 70 लाख रुपये ठेवली आहे. दमदार इंजिन आणि आकर्षक लूक असलेली ही सुपर बाईक देशातील तरुणाईला चांगकीच भुरळ घालेल यात शंकाच नाही. आज आपण Ducati Panigale V4 R च्या फीचर्स बाबत जाणून घेऊया….

   

998 cc इंजिन-

कंपनीने या सुपर बाईकमध्ये 998 cc Desmosedici Stradale R इंजिन वापरले आहे. ते 16,500 rpm वर फिरते. हे इंजिन 15,500 rpm वर 215 Bhp ची पॉवर जनरेट करते. तसेच, अक्रापोविक एक्झॉस्ट एकूण आउटपुट 234 Bhp पर्यंत वाढवते. ही एक टॅंक ओरिएंटेड सुपर बाईक असल्यामुळे यामध्ये इलेक्ट्रॉनिक चा संपूर्ण सेटअप आहे. टॅंक इन्व्हो आणि रिकॅलिब्रेट डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल, राइड बाय वायर आणि इंजिन ब्रेक कंट्रोल EVO2 सिस्टीमचा देखील वापर यामध्ये करण्यात आला आहे.

299 किमी टॉपस्पीड-

ही बाईक वेगवेगळ्या ड्रायव्हिंग मोडमध्ये चालवता येऊ शकते ज्यामध्ये फुल, हाय, मिडीयम आणि लो मोडचा वापर करण्यात येतो. या बाईकचे वजन 193.5 किलो एवढे असून BMW S 1000 RR Pro M Sport या बाईकला मिळती जुळती आहे. या बाईकच्या वेगाबद्दल अजूनही कोणतीही माहिती आलेली नसली तरी अंदाजे ही बाईक केवळ 3.3 सेकंदामध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग पकडू शकते. त्याचबरोबर तिचा टॉप स्पीड 299 किमी प्रति तास आहे.