Ducati स्केम्बलर रेंज लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी | इटालियन कंपनी डूकाटी ही स्पोर्ट बाईक बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. डूकाटीच्या बाईक अतिशय आकर्षक आणि स्पोर्टी असल्याने तरुणाईच्या मनात चांगलीच भुरळ पाडतात. आताही कंपनीने भारतामध्ये स्केम्बलर ची नेक्स्ट जनरेशन रेंज ही स्पोर्ट बाईक लॉन्च केली आहे. या स्पोर्ट बाईकला पूर्णपणे नवीन डिझाईन आणि नवीन लुक देण्यात आला आहे. त्याचबरोबर यामध्ये बऱ्याच नवीन ॲक्सेसरीज देखील उपलब्ध करण्यात आले आहेत. भारतीय बाजारात ही स्पोर्ट बाईक कावासाकी Z800 ला तगडी फाईट देईल. आज आपण या बाईक चे खास फीचर्स जाणून घेऊयात.

   

इंजिन –

स्केम्बलरच्या या नेक्स्ट जनरेशन रेंज या स्पोर्ट बाईक मध्ये 803 cc ट्वीन सिलेंडर एयर कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 72 bhp पावर आणि 65 nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत बाय डायरेक्शन क्वीकशिफ्ट सह 6 स्पीड गिअर बॉक्स जोडण्यात आला आहे. कंपनीने ही बाईक तीन व्हेरीएंट मध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये आयकॉन, फील थाटल आणि नाईट शिफ्ट या व्हेरिएंटचा समावेश आहे.

अन्य फीचर्स –

डूकाटी स्केम्बलर रेंज या बाईकमध्ये ऍडजेस्टेबल ट्रॅक्शन कंट्रोल उपलब्ध आहे. यासोबतच कंपनीने यामध्ये दोन रायडींग मोड उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे रोड आणि दुसरा म्हणजे वेट. एवढेच नाही तर कंपनीने यामध्ये नवीन कंपोनंट्स वापरले आहेत. या बाईकच्या चेसिस मध्ये ट्यूबलर स्टील ट्रेलिस फ्रेम उपलब्ध करण्यात आली आहे. या रेंज बाइक चे वजन कंपनीने पूर्वीपेक्षा 4kg एवढे कमी केले आहे. ज्यामुळे ही बाईक हलकी आणि जास्त फास्ट झाली आहे.

किमत किती ?

डूकाटी स्केम्बलर रेंज मध्ये ब्रेकिंग साठी फ्रंट साईडने 330 mm डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. आणि गिअर मध्ये कोनरिंग ABS फंक्शनसह 245 mm डिस्क ब्रेक उपलब्ध आहे. कंपनीने यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल देखील दिले आहे. यासोबतच LED लाइटिंग, 4.3 इंच कलर टफ्ट इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यासारखे फीचर्स कंपनीने यात जोडले आहेत.गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास तिन्ही व्हेरिएन्ट नुसार किमती सुध्दा वेगवेगळ्या आहेत. यातील बेस व्हेरीएंट आयकॉन ची किंमत 10.40 लाख रुपये एवढी आहे.