मार्केटमध्ये येणार Gear नसलेली बाईक; गाडी चालवणं होणार आणखी सोप्प

टाइम्स मराठी । बाईक चालवत असताना हातातील क्लच आणि पायातील ब्रेक यांचा समतोल साधन गरजेचं असत. जर आपण योग्य पद्धतीने क्लच, गिअर आणि ब्रेकचा वापर केला नाही तर आपली बाईक लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात. आपल्याला बाईक चालवताना हात आणि पायांच्या मदतीने गाडी कंट्रोल करण्यासाठी या तिन्ही गोष्टींना व्यवस्थित हँडल करावे लागते. परंतु आता या समस्यांचे निराकरण म्हणून नवीन टेक्नॉलॉजी वर काम सुरू आहे. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला गिअर चेंज करण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच आता मार्केटमध्ये लवकरच  गिअर फ्री बाईक लॉन्च करण्यात येणार आहे.

   

जपानी टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणून ओळख असलेली होंडा ही सध्या स्पेशल ई क्लच टेक्नॉलॉजी वर काम करत आहे. या टेक्नॉलॉजीमध्ये ऑटोमेटेड क्लच सिस्टीम वापरण्यात आले आहे. जेणेकरून बाईकमध्ये क्लच लेस गिअर शिफ्टिंग सुविधा उपलब्ध होईल. जेणेकरून पारंपारिक पद्धतीने बाईक ड्रायव्हिंग करण्याची पद्धत बदलेल. जाणून घेऊया काय आहे ही टेक्नॉलॉजी.

काय आहे ही टेक्नॉलॉजी

E-Clutch टेक्नॉलॉजी ही इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशन ( IMT) गिअरबॉक्स  प्रमाणे आहे. ही टेक्नॉलॉजी हुंडाई आणि किया च्या काही कार मध्ये देखील उपलब्ध आहे. यामध्ये क्लच उपलब्ध नसतो. परंतु तरीही यामध्ये मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. यामध्ये क्लच ऍक्टिव्ह आणि इन ॲक्टिव्ह करण्यासाठी गिअर लिवर वर इंटेलिजंट इंटेंशन सेंसर वापरण्यात येते. होंडा कंपनी काम करत असलेल्या टेक्नॉलॉजी नुसार बाईक मध्ये क्लच उपलब्ध असेल परंतु त्याचा काहीच फायदा होणार नाही.

हा आहे मेन उद्धेश

ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठीचा महत्वाचा उद्देश हा विदाऊट क्लच बाईक रायडिंग सोईस्कर आणि सोपी बनवणे हा आहे. दररोज नियमितपणे बाईकवरून प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी ही टेक्नॉलॉजी स्पेशल गिफ्ट ठरू शकते.  मल्टी गिअर बाईकच्या ट्रान्समिशन साठी जगातील पहिली ऑटोमॅटिक क्लच कंट्रोल सिस्टीम वापरण्यात येईल. असा दावा होंडा कंपनीने केला आहे.

अशा पद्धतीने करते काम

E-Clutch इलेक्ट्रॉनिक कंट्रोल टेक्नॉलॉजी ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरळीतपणे कार्य करण्यासाठी वापरण्यात आली आहे. यामध्ये ऑटोमॅटिक क्लच कंट्रोल सिस्टीमची सुविधा देण्यात येते.  E-Clutch हे मॅन्युअल क्लच ऑपरेटिंगच्या तुलनेमध्ये जास्त कम्फर्टेबल आणि गिअर शिफ्टिंग साठी सोईस्कर आहे. मॅन्युअल क्लच पेक्षा  E-Clutch च्या वापरामुळे रायडरला बाईक चालवताना आरामदायिक आणि स्मूथ गिअर शिफ्टिंगचा अनुभव मिळेल. E-Clutch सिस्टीम ही कोणत्याही बाईक मध्ये मॅन्युअल क्लच लिवर प्रमाणेच मिळेल. परंतु काम करत असताना ऑटोमॅटिक पद्धतीने करेल. म्हणजेच आता बाईक चालवताना गिअर बदलण्यासाठी डबल डबल क्लच वापरण्याची गरज नाही.