E-Sprinto ने लॉन्च केल्या Rapo आणि Roamy या 2 इलेक्ट्रिक स्कूटर; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी | सध्या पेट्रोल डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी कडे  ग्राहकांचा मोठा कल दिसून येतो. त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या e-sprinto कंपनीने  भारतीय बाजारपेठेत 2 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. . e-sprinto या इलेक्ट्रिक वाहन डेव्हलप करणाऱ्या कंपनीने लॉन्च केलेल्या दोन स्कूटरचे नाव  RAPO आणि ROAMY आहे. आज आपण जाणून घेऊया या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर चे स्पेसिफिकेशन आणि किंमत

   

किंमत

या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर युजर्सच्या संपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन आणि डेव्हलप करण्यात आली आहे. RAPO आणि ROAMY  या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये कंपनीने वेगवेगळे फीचर्स उपलब्ध केले असून किंमत देखील  1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. यामधील RAPO या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 62,999 रुपये एवढी असून ROAMY या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 54,999 रुपये आहे.

बॅटरी

e-Sprinto ROAMY या लॉन्च करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये लिथियम आयन आणि लेड ऍसिड बॅटरी हे दोन ऑप्शन देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर ला पावर देण्यासाठी बॅटरी सोबतच  IP65 रेटेड 250W मोटर देण्यात आली आहे. ही मोटर प्रति तास 25 किलोमीटर एवढी टॉप स्पीड देते. Roamy  इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 170mm ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. ज्यामुळे कोणत्याही अडचणी शिवाय ही स्कूटर खड्डे किंवा कोणत्याही रस्त्यावर चालण्यास सक्षम आहे.

Sprinto RAPO आणि ROAMY  सस्पेन्शन आणि ब्रेकिंग

e-Sprinto RAPO आणि ROAMY या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये देण्यात आलेल्या सस्पेन्शन आणि ब्रेकिंग बद्दल बोलायचं झालं तर, कंपनीने दोन्हींमध्ये सेम ब्रेकिंग सिस्टीम वापरली आहे. त्यानुसार  दोन्ही स्कूटर मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आणि रियर मध्ये थ्री स्टेप ऍडजेस्टेबल कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन देण्यात आले आहे. ब्रेकिंग साठी या स्कूटरमध्ये फ्रंट साईडने डिस्क ब्रेक आणि रियरला ड्रम युनिट मिळते. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 12 इंच फ्रंट व्हील आणि 10 इंच रियर व्हील दिले आहे.

फिचर्स

Sprinto RAPO आणि ROAMY या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये रिमोट लॉक आणि अनलॉक, रिमोट स्टार्ट, USB मोबाईल चार्जिंग, फुल डिजिटल डिस्प्ले  यासारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीने रेपो आणि रोमी मध्ये लाल, निळा, ग्रे, काळा आणि पांढरा हे कलर ऑप्शन उपलब्ध केले आहे.