या Apps च्या माध्यमातून कमवा ऑनलाईन पैसे; कमी वेळेत होईल भरपूर फायदा

टाइम्स मराठी । आजकाल वाढत्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लोकदेखील अपग्रेड होत आहेत. यासोबतच बरेच जण हे सोशल मीडियाच्या आणि एप्लीकेशनच्या माध्यमातून घरबसल्या पैसे कमवतात. या माध्यमातून पैसे कमावणे हे अतिशय सोपे आहे. तुम्ही Apps च्या माध्यमातून  एंटरटेनमेंट सोबतच मजेशीरपणे पैसेही कमवू शकतात. तुम्ही देखील घरबसल्या पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत अशा एप्लीकेशन बद्दल ज्या एप्लीकेशन च्या माध्यमातून आपण भरपूर नफा मिळवू शकतो.

   

मिशो (Meesho)

Meesho हे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युजर शॉपिंग सोबतच रिसेलिंग देखील करू शकतात. जर तुम्ही कॉलेज स्टूडेंट असाल किंवा हाऊस वाईफ असाल तर मीशोच्या माध्यमातून प्रॉडक्ट रिसेलिंग करून चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर जे प्रॉडक्ट  रिसेल करायची आहे ते निवडावे लागेल. त्यानंतर तुम्ही त्या प्रॉडक्टची मार्जिन स्वतः सेट करू शकतात. जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील. Meesho सोबतच तुम्ही Flipkart – Amazon वर देखील प्रोडक्ट रिसेल करू शकतात. जेणेकरून तुमचा एक छोटासा बिजनेस देखील होईल आणि पैसे देखील मिळतील.

फोनपे (PhonePe)-

PhonePe हे डिजिटल बँकिंग ॲप आहे. एप्लीकेशनच्या माध्यमातून आपण ज्याप्रमाणे पैसे ट्रान्सजेक्शन करतो त्या प्रकारे आपण  फोन पे च्या माध्यमातून पैसे कमवू देखील शकतो. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचे टीव्ही किंवा मोबाईल रिचार्ज करून देत असाल किंवा शॉपिंग करून पेमेंट करत असाल तर कॅशबॅक ऑफर तुम्हाला मिळू शकते. आणि या कॅशबॅक ऑफरच्या माध्यमातून तुम्ही पैसे मिळवू शकतात. एवढेच नाही तर तुम्ही फोन पे हे ॲप तुमच्या मित्रांना रेफर केल्यानंतर  तुम्हाला 200 ते 500 रुपये रोज मिळू शकतात.

Roz Dhan App

हे इंडियन पैसे कमवण्यासाठी  एक ॲप आहे. या ॲपवर तुम्ही आर्टिकल वाचून, व्हिडिओ पाहून वेगवेगळे गेम खेळून पैसे कमवू शकतात. या रोज धन ॲप मध्ये वेगवेगळे डेली टास्क दिले जातात. हे डेली ट्रान्स कम्प्लीट केल्यानंतर  तुम्हाला पैसे कमावण्याचा चान्स मिळतो. या एप्लीकेशनच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या  पैसे कमवू  शकतात. यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. या आपलिकेशन च्या माध्यमातून तुमचे एंटरटेनमेंट देखील होईल आणि पैसे देखील मिळतील.