अंतराळात सापडला पृथ्वी सारखाच दुसरा ग्रह; मनुष्याला राहण्यायोग्य ठरेल का?

टाइम्स मराठी । विश्वमित्रने सृष्टी सारखीच आणखीन एक गोष्टी तयार केली होती असं म्हणतात. त्याचबरोबर अंतराळामध्ये बऱ्याच रहस्यमय घटना घडत असतात. अशातच आता जपानच्या शास्त्रज्ञांना दुसरी पृथ्वी (EARTH like Planet)सापडली आहे. हे ऐकण्यासाठी जरी काल्पनिक वाटत असलं तरीही पृथ्वी सारखीच दिसणारी दुसरी पृथ्वी आपल्याच सूर्यमालेमध्ये सामील आहे. यावरून आपल्याला पृथ्वी सारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या पृथ्वीवर राहता येईल का अशा चर्चांना सुद्धा उधाण आले आहे. जाणून घेऊया जपानने काय दावा केला आहे.

   

जपानने लावला नवव्या ग्रहाचा शोध

जपानच्या शास्त्रज्ञांच्या मते, आपल्या सूर्यमालेमध्ये प्लुटो या ग्रहाचा दर्जा हटवल्यानंतर आपल्या सूर्यमालेतील ग्रहांची संख्या ही आठ वर आली होती. आता जपानने शोधून काढलेल्या पृथ्वी सारख्याच दुसऱ्या पृथ्वी ग्रहामुळे ही संख्या आठ वरून नऊ वर आली आहे. म्हणजेच जपानने 9 व्या ग्रहाचा शोध लावला आहे. पृथ्वी सारखे ग्रह शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत.

कुठे आहे हा ग्रह

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जपानच्या वैज्ञानिकांना सापडलेला हा पृथ्वी सारखा नववा ग्रह आपल्या सूर्यमालेतील असून हा ग्रह क्विपर बेल्ट मध्ये लपलेला आहे. सूर्यमालेतील शेवटचा ग्रह नेपच्यून हा ओलांडल्यानंतर क्विपर बेल्ट सुरू होतो. हा गोल आकाराचा पट्टा आहे. जो पूर्ण सूर्यमालेला घेतो. आणि या क्विपर बेल्ट मध्ये लाखो लघुग्रह आहेत. हे लघुग्रह बर्फाने झाकले गेले आहेत.

या विद्यापीठाने लावला हा शोध

जपान मधील ओसाका या ठिकाणी असलेल्या किंदाई विद्यापीठातील पॅट्रिक सोफिया लिकावाका आणि टोकियोच्या राष्ट्रीय खगोलशास्त्रीय वेधशाळेने हा शोध लावला आहे. त्यांनी लावलेल्या या संशोधनाचा अहवाल द ऍस्ट्रॉनॉमिकल जर्नल मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार त्यांनी सांगितलं की, आम्हाला पृथ्वी सारखा दुसरा ग्रह असल्याची शक्यता आहे. क्विपर बेल्ट मध्ये हा ग्रह असू शकतो. सूर्यमालेमध्ये सुरुवातीच्या काळापासूनच असे ग्रह अस्तित्वात आहे. परंतु त्या ठिकाणी जीवसृष्टी असणे अशक्य आहे.

पृथ्वीपेक्षा तीन पट मोठा

क्विपर बेल्ट हा ग्रह आकाराने पृथ्वीपेक्षा तीन पट मोठा आहे. परंतु असं असलं तरीही त्या ठिकाणी राहणे आणि जीवसृष्टी टिकवणे अशक्य आहे. आपण राहत असलेली पृथ्वी हे सूर्यमालेमध्ये जीवसृष्टी राहणायोग्य क्षेत्रात येते. परंतु नवीन आढळलेली दुसऱ्या पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण करणे कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे.

पृथ्वीपासून एवढ्या किलोमीटरवर आहे हा ग्रह

जपानच्या शास्त्रज्ञांच्या मते, या नवीन नव्या ग्रहाचे नाव क्विपर बेल्ट प्लॅनेट असे आहे. पृथ्वीपासून क्विपर बेल्ट हा ग्रह 4.5 अब्ज किलोमीटर अंतरावर आहे. एवढेच नाही तर हा क्विपर बेल्ट प्लॅनेट ग्रह पृथ्वीपेक्षाही तीन पटीने मोठा आहे.