नादच खुळा!! 8 वी पास मिस्त्रीने बनवली इको फ्रेंडली कार; 70 KM रेंज

टाइम्स मराठी । भारतात प्रतिभावान व्यक्तींची कमी नाही. आपण रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती बघत असतो ज्यांचे शिक्षण नसून सुद्धा फक्त त्यांच्या कलेच्या, चिकाटीच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी काहीतरी कमाल करून दाखवली आहे. काहीतरी नवीन करण्याची जिद्द असलेल्या व्यक्ती नेहमीच काहीतरी कमाल करतांना आपण पाहत असतो. अंगात कला आणि नवीन काहीतरी करण्याची आवड असलेल्या व्यक्तीस शिक्षणाची गरज नसते. असेच एक उदाहरण राजस्थान मध्ये समोर आले आहे. येथील एका ८ वी पास मिस्त्री ने कचऱ्यापासून इको फ्रेंडली कार बनवली आहे.

   

कोण आहे हि व्यक्ती –

या मिस्त्रींचे नाव आहे कन्हय्यालाल जांगीड, ते राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यामधील चिडावा येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण फक्त आठवी पर्यंत झालं आहे. परंतु हाती असलेल्या कलेच्या जोरावर कन्हय्यालाल यांनी कचऱ्यातून एक इको फ्रेंडली कार बनवली आहे. इको फ्रेंडली बरोबरच ही कार एकदा फुल्ल चार्ज केल्यावर 70 किलोमीटर पर्यंत चालते. कन्हय्यालाल जांगीड यांनी याबाबत म्हंटल कि, ते खूप वर्षांपासून गाडी दुरुस्तीचे काम करतात. यादरम्यान त्यांनी जुन्या कार चे स्पेयर पार्टस जमवले. या जमवलेल्या स्पेयर पार्टस पासून त्यांनी ही कमाल करून दाखवली आहे. त्यांनी बनवलेली इको फ्रेंडली कार ती याच स्पेयर पार्टस पासून बनवली आहे. या बरोबर कन्हय्यालाल यांनी मोटर,कार ची बॅटरी, ई- रिक्षा चे टायर्स या सारख्या गोष्टींचा वापर कार बनवण्यासाठी केला.

फुल्ल चार्ज मध्ये 70 KM पर्यंत धावणार –

कन्हय्यालाल यांनी सांगितले की एकदा चार्जे केल्यावर ही कार 70 किलोमीटर पर्यंत चालते. यासाठी त्यांनी 48 वोल्ट च्या चार बॅटरी वापरली आहेत. या बॅटरी चार्जिंग खर्च साधारण 10 ते 12 रुपये एवढा येतो. भविष्यात ते एकच बॅटरी करण्याच्या विचारात आहेत. या कार मधून एकावेळेस चार लोक प्रवास करू शकतात. कार बनवण्यासाठी जांगीड यांना साधारण 1.50 ते 2 लाख रुपये एवढा खर्च आला. कन्हय्यालाल यांनी घरच्या जबाबदाऱ्यांमुळे शिक्षण पूर्ण केले नाही. त्यांनी फक्त आठवी पर्यंत शिक्षण केले. आणि त्यांनतर ते मिस्त्री बनले. कन्हय्यालाल यांनी बनवलेली ही कार पाहून पुन्हा सिद्ध होते की,अंगात कला आणी चिकाटी असल्यास माणूस काहीही करू शकतो.