परवडणाऱ्या किंमतीत लाँच झाली इलेक्ट्रिक सायकल; मिळतील ‘हे’ खास फीचर्स

टाइम्स मराठी । सायकलप्रेमी आणि पर्यावरणप्रिय लोकांसाठी गिअर हेड मोटर्स या कंपनीने कमी किमतीमध्ये इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे. ही L2.0 सिरीजची इलेक्ट्रिक सायकल असून यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये या इलेक्ट्रिक सायकलची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. अतिशय खास फीचर्सने सुसज्ज असलेली ही इलेक्ट्रिक सायकल जवळच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरू शकते. आज आपण या इलेक्ट्रिक सायकलचे खास फिचर्स आणि तिच्या रेंज बाबत जाणून घेणार आहोत.

   

स्पेसिफिकेशन

गियर हेड मोटर्सच्या L2.0 या इलेक्ट्रिक सायकल मध्ये 250W GHM पावरफूल मोटर देण्यात आली आहे. त्याचबरोबर या इलेक्ट्रिक सायकल मध्ये 36 V 6Ah लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी २ तासांचा कालावधी लागतो. परंतु एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर ही इलेक्ट्रिक सायकल पेंडल असिस्टच्या मदतीने 30 किलोमीटर पर्यंत रेंज देते.

फीचर्स

गियर हेड मोटर्सच्या L2.0 या इलेक्ट्रिक सायकल मध्ये दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक वापरण्यात आले आहे. हे डिस्क ब्रेक इ कट ऑफ टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असून या ब्रेकमुळे मोटर आपोआप थांबते. यासोबतच एलईडी लाईट, 100 mm ट्रॅव्हल सह टेलिस्कोपीक फ्रंट फोर्क, 27.5 इंचचे यामध्ये टायर देण्यात आले आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक सायकल पाणी आणि धुळीपासून कोणताही त्रास होणार नाही अशा प्रकारे सुरक्षित डिझाईनमध्ये डेव्हलप केली आहे.

वारंटी

गियर हेड मोटर्सच्या L2.0 या इलेक्ट्रिक सायकलच्या बॅटरी पॅक वर कंपनीने 2.5 वर्षांची वॉरंटी दिली आहे. आणि या सायकलच्या फ्रेमवर लाईफ टाईम वॉरंटी देण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक सायकल रेड आणि स्काय ब्लू कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध असून या सायकलचे वजन 22 kg एवढे आहे. L2.0 या इलेक्ट्रिक सायकल च्या लॉन्चिंग वेळी गियर हेड मोटर्सचे सह संस्थापक निखिल गुंडा यांनी सांगितलं की, आमच्याकडे मेक इन इंडिया प्रमाणपत्र असून या इलेक्ट्रिक सायकलचे 85% पार्ट हे भारतातच तयार करण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक सायकल तुम्हाला वेगवेगळे रायडिंग एक्सपिरीयन्स देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.