Electric Bike : 171 KM रेंज देतेय ही इलेक्ट्रिक बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । आजकाल पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Bike) प्रचंड पसंत केले जाते. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाईकचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यानुसार बऱ्याच कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये उतरल्या असून इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये बऱ्याच स्कूटर आणि टू व्हीलर लॉन्च होत आहेत. त्यानुसार आता इंडियन टू व्हीलर मार्केटमध्ये Pure EV कंपनीने नवीन इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या बाईकचे नाव ecoDryft 350 आहे. या स्कूटर मध्ये कंपनीने आरामदायक प्रवासासाठी सिंगल सीट दिली आहे. जाणून घेऊया या बाईकचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

   

बॅटरी

Pure EV ecoDryft 350 या Electric Bike मध्ये 3.5 kwh लिथियम आयन बॅटरी मिळते. ही बॅटरी 6 MCU सह इलेक्ट्रिक मोटर 4 hp पावर आणि 40 nm पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकचे टॉप स्पीड 75 km प्रति तास इतक आहे. तसेच एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक बाईक तब्बल 171 किलोमीटर पर्यंत अंतर पार करते. Pure EV ची ही बाईक 110cc कम्यूट सेगमेंट मध्ये सर्वात जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक बाईक आहे.

फिचर्स- Electric Bike

Pure EV ecoDryft 350 या Electric Bike मध्ये  रिव्हर्स मोड, कॉस्टिंग रीजन, हिल स्टार्ट असिस्ट, डाऊन हिल असिस्ट आणि पार्किंग असिस्ट यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये तीन वेगवेगळे रायडिंग मोड उपलब्ध केले असून ही हाय स्पीड न्यू जनरेशन इलेक्ट्रिक बाईक आहे. कंपनीने या बाईकमध्ये स्मार्ट AI चार्ज ची स्थिती (SOC) हेल्थ कंडिशन (HOC) मॉनिटर करून बॅटरीची लाईफ वाढवण्यासाठी मदत करतात.

किंमत किती?

या इलेक्ट्रिक बाईकची किंमत 1.30 लाख रुपये एवढी आहे. कंपनीकडून या बाईकच्या खरेदीवर 4000 रुपये प्रति महिना EMI ऑप्शन उपलब्ध केले आहे. म्हणजेच तुम्ही ही इलेक्ट्रिक बाइक ₹4,000 महिन्याच्या सुरुवाती किमतीत खरेदी करू शकतात. ही इलेक्ट्रिक बाईक बाजारात हॉप ओक्सो ला जोरदार टक्कर देईल.