Electric Bike : बाजारात आली परवडणारी इलेक्ट्रिक बाईक; 100 KM रेंज, किंमत किती?

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Bike) चलती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढते पेट्रोल डिझेलचे भाव आणि महागाई यामुळे इलेक्ट्रिक वाहन हा पर्याय सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये बऱ्याच कंपन्यांनी त्यांचे लक आजमावले असून आता भारतीय बाजारपेठेत  Kratos R Urban ही इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करण्यात आली आहे. जे ग्राहक परवडणाऱ्या किमतीत गाडी खरेदी करण्याचा विचार करत आहेत अशा लोकांसाठी ही बाईक नक्कीच बेस्ट पर्याय ठरेल. आज आपण या इलेक्ट्रिक बाईकचे खास फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत जाणून घेऊयात.

   

100 किलोमीटर रेंज- Electric Bike

Kratos R Urban या Electric Bike मध्ये 7.5 KW इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक मोटर 28 NM पीक टॉर्क जनरेट करते. ही मोटर 4.5 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तास वेग पकडण्यास सक्षम आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर च्या रेंज बद्दल बोलायचं झालं तर एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 100 किलोमीटर एवढी रेंज येते. त्यामुळे तुम्ही अगदी कमी खर्चात प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

फिचर्स-

Kratos R Urban या Electric Bike मध्ये LED हेडलाईट, LED टेललाईट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ट्यूबलेस टायर, ड्युअल चॅनेल ABS, ट्वीन पॉड टेलिस्कोपीक फ्रंट फोर्क्स, मोनोशॉक रियल सस्पेन्शन यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. हे फीचर्स  बाईक चालवताना तुम्हाला सुरक्षित आणि आरामदायक अनुभव देतील. यासोबतच तुम्ही जर रोज 20 किलोमीटर एवढा प्रवास करत असाल तर ही बाईक तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

किंमत

गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, या इलेक्ट्रिक स्कूटर ची एक्स शोरूम किंमत 1.2 लाख रुपये आहे. यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या  KRATOS R या वाहनाच्या किमतीपेक्षा ही किंमत कमी आहे. KRATOS R URBAN ही सर्वात परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध असलेली इलेक्ट्रिक बाईक असून अप्रतिम मायलेज देते. यामध्ये बरेच फीचर्स देण्यात आले आहेत.