Electric Bike : 140 KM रेंजसह लाँच झाली दमदार इलेक्ट्रिक बाईक; किंमत किती?

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि महागाई पाहता इलेक्ट्रिक वाहन (Electric Bike) खरेदी करण्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा लुक आणि डिझाईन सुद्धा आकर्षक असल्याने आजच्या तरुण पिढीला चांगलीच भुरळ पडत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली असून अनेक कंपन्या मार्केट मध्ये आपल्या इलेक्ट्रिक गाड्या अनंत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनी MXMOTO ने इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. MXMOTO या कंपनीने लॉन्च केलेल्या या नवीन इलेक्ट्रिक बाईकचं नाव MX9 आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक बाइक दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केली आहे. यामध्ये ब्लॅक आणि ड्युलटोन ग्रे एन्ड ब्लॅक हे दोन ऑप्शन्स आहेत. ही बाईक रिवोल्ट RV400, टॉर्क T6X, अल्ट्रा वायलेट F77 या गाड्यांशी स्पर्धा करेल.

   

रेंज किती? Electric Bike

MX9 या इलेक्ट्रिक बाइक मध्ये 3.2 kw LIP04 बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही बॅटरी 4 तासात फुल चार्ज होते. त्याचबरोबर या बाईकमध्ये 4000 W ची मोटर देखील देण्यात आली आहे. ही हब मोटर 148 nm पीक टॉर्क जेनरेट करते. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही बाईक 120 ते 140 किलोमीटर एवढी रायडींग रेंज देते.

फीचर्स –

MX9 या Electric Bike मध्ये 17 इंच अलॉय व्हील देण्यात आले आहे. यासोबतच 60 AMP कंट्रोलर, रीजेनरेटिव ब्रेकिंग सिस्टीम देखील या बाईक मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ऍडजेस्टेबल रियल सस्पेन्शन देखील देण्यात आले आहे. यामुळे सेंट्रल शॉक अब्सॉर्बर निर्माण होते. MX9 या इलेक्ट्रिक बाइक मध्ये टीएफटी स्क्रीन, ऐप इंटीग्रेशन, साउंड सिस्टम, क्रूज़ कंट्रोल, रिवर्स असिस्ट, एंटी-स्किड/हिल असिस्ट आणि पार्किंग असिस्ट हे फीचर्स उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक बाइक ची किंमत 1.45 लाख रुपये एवढी आहे.